‘त्या’ व्यक्तीच्या जबाबामुळे वाल्मिक कराड अडकला; कराड गँगचं गुपित उघड

On: March 27, 2025 3:04 PM
Santosh Deshmukh Case Office Boys Statement
---Advertisement---

Santosh Deshmukh Case | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या कबुलीनंतर आता आवादा एनर्जी कंपनीच्या एका ऑफिस बॉयनं दिलेला जबाब पोलिसांसाठी निर्णायक ठरत आहे. या जबाबामुळे वाल्मिक कराड (Walmik Karad) गँगच्या हालचाली आणि हत्येपूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. (Santosh Deshmukh Case)

ऑफिस बॉयच्या जवाबामुळे उघड झाली धमकीची मालिका

६ डिसेंबर २०२४ रोजी आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातल्याची माहिती ऑफिस बॉयने आपल्या जबाबात दिली आहे. तेव्हा गोंधळ मिटवण्यासाठी गेलेल्या वॉचमनवर आरोपींनी मारहाण केली. याच वेळी घुलेने “मी कराडचा माणूस आहे. कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा,” अशी उघड धमकी दिली होती.

घुलेच्या या धमकीदरम्यान, गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) घटनास्थळी पोहोचले आणि कंपनी बंद करू नका, गावातील लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, अशी विनंती केली. मात्र, त्यावर सुदर्शन घुले अधिक आक्रमक झाला. त्याने सरपंचांना थेट धमकी दिली की, “तुला बघून घेईन, तुला जिवंत ठेवणार नाही.” या धमकीनंतरच पुढे देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे याच घटनाक्रमातून स्पष्ट होतं.

कराड गँगला अडकवण्यासाठी ठरला निर्णायक पुरावा

सदोष कबुलीजबाब दिलेल्या घुलेसह अन्य आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे. परंतु ऑफिस बॉयच्या साक्षीमुळे पोलिसांकडे आता स्वतंत्र आणि थेट पुरावा उपलब्ध झाला आहे. या जबाबामुळे केवळ घुलेच नव्हे तर वाल्मिक कराडसह संपूर्ण गँगच्या सहभागावर शिक्कामोर्तब झालं आहे.

या जवाबाचा उल्लेख बुधवारी पार पडलेल्या न्यायालयीन सुनावणीतही करण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात हा पुरावा मांडत आरोपींना कसे नियोजनबद्धपणे गुन्हा केला, हे अधोरेखित केलं. यामुळे चार्ज फ्रेमसाठी या घटनेचा साक्षीदार असलेला ऑफिस बॉय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

 Title : Santosh Deshmukh Case Office Boys Statement Exposes  

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now