संतोष देशमुखांच्या मारहाणीचा हृदय पिळवटून टाकणारा आणखी एक व्हिडीओ समोर!

On: March 7, 2025 2:03 PM
Santosh Deshmukh Case Murder
---Advertisement---

Santosh Deshmukh Case | बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आरोपींनी त्यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो काढले. या व्हिडीओत संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारताना आणि केस धरून फरफटताना दिसत आहे. हा प्रकार बघून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. (Santosh Deshmukh case)

आरोपींकडून अमानुष मारहाण 

संतोष देशमुख यांनी ‘मला मारू नका’ अशी विनवणी केली, मात्र आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना निर्दयपणे मारहाण सुरूच ठेवली. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने “सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे” असे बोलायला लावले. 6 नोव्हेंबर 2025 रोजी आवादा कंपनीत घडलेल्या प्रसंगाचा संदर्भ देत त्यांना मारहाण करण्यात आली. तपकिरी आणि पांढऱ्या पाईपने त्यांना सातत्याने मारहाण करण्यात आली.

आरोपींनी वेळेनुसार रेकॉर्ड केले अत्याचार

मुख्य आरोपी महेश केदार याने संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि फोटो वेळेनुसार रेकॉर्ड केले.

  • 3:45 PM – पहिला व्हिडीओ (1 मिनिट 10 सेकंद)
  • 3:47 PM – दुसरा व्हिडीओ (53 सेकंद)
  • 3:48 PM – तिसरा व्हिडीओ (35 सेकंद)
  • 3:50 PM – एक फोटो
  • 3:52 PM – चौथा व्हिडीओ (2.4 सेकंद)
  • 3:53 PM – पाचवा व्हिडीओ (7 सेकंद)
  • 3:54 PM – सहावा व्हिडीओ (36 सेकंद)
  • 3:55 PM – सातवा व्हिडीओ (14 सेकंद)
  • 3:58 PM – आठवा व्हिडीओ (2 सेकंद)
  • 3:59 PM – नववा व्हिडीओ (5 सेकंद)
  • 3:59 PM – दहावा व्हिडीओ (12 सेकंद)
  • 5:34 PM – अकरावा व्हिडीओ (1 मिनिट 44 सेकंद)
  • 5:35 PM – बारावा व्हिडीओ (1 मिनिट)
  • 5:53 PM – तेरावा व्हिडीओ (24 सेकंद)

हत्येच्या फोटो आणि व्हिडीओंनी उघड केली आरोपींची क्रूर मानसिकता

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, संतोष देशमुख यांना निर्दयतेने मारहाण करण्यात आली हे व्हायरल झालेल्या फोटोंमधून स्पष्ट झाले आहे. आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये या अत्याचाराचे व्हिडीओ आणि फोटो सेव्ह करून ठेवले होते. हे पुरावे समोर आल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. (Santosh Deshmukh Case)

Title : Santosh Deshmukh Case Murder Video Viral

 

Join WhatsApp Group

Join Now