‘त्या’ एका मेसेजमुळे संतोष देशमुखांचा गेम झाला; धक्कादायक खुलासा समोर

On: March 27, 2025 12:33 PM
Santosh Deshmukh Case Murder
---Advertisement---

Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी बुधवारपासून न्यायालयात सुरू झाली आहे. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) आणि आरोपी वाल्मीक कराड (Valmik Karad) यांचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद मांडला. या खटल्यातील पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद

बुधवारी झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येचा सविस्तर घटनाक्रम वेळ व तारखेनुसार न्यायालयासमोर मांडला. त्यांनी या प्रकरणात मुंबईतील २६/११ हल्ल्याचा संदर्भ देत आपली केस ओपन करण्याची मागणी केली. यामध्ये आवादा (Avada) कंपनीकडून सुरू असलेल्या प्रकल्पावर खंडणी मागणीसाठी सुरू झालेल्या संघर्षाचे वर्णन करण्यात आले. निकम यांनी दाखवलेल्या पुराव्यांमध्ये कॉल डिटेल्स, सीडीआर, टॉवर लोकेशन, व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश होता. त्यांनी स्पष्ट केले की, ८ ऑक्टोबर २०२४ पासून खंडणीची मागणी सुरू झाली आणि ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. आरोपींचे या कटात सक्रिय सहभागाचे पुरावे सादर करण्यात आले.

8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले. त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे याने वाल्मीक कराड याचा मेसेज सुदर्शन घुले याला दिला. आडवे आले तर कायमचा धडा शिकवा.

त्यानंतर 9 डिसेंबर 2024 दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केस बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. आमचे काही होऊ शकत नाही. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार आहे. असा तब्बल 32 मिनिट युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला.

कराडच्या वकिलांचा आक्षेप

वाल्मीक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद करताना असा आक्षेप घेतला की, सरकारी वकिलांकडून वारंवार सांगितले जाणारे सीडीआर आणि टॉवर लोकेशनचे पुरावे अद्याप आरोपींच्या वकिलांना प्राप्त झालेले नाहीत. यासाठी त्यांनी मागील आणि चालू तारखेला अर्ज केला होता.

त्यांच्या या मागणीवर सुनावणी घेत, न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की, सर्व संबंधित कागदपत्रे आणि पुरावे आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून दिले जावेत. या आदेशानंतर प्रकरणाची पुढील सुनावणी आता १० एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. या सुनावणीत अनेक नवे पुरावे, कबुलीजबाब आणि व्हिडीओ सादर झाल्यामुळे खटल्याने वेग पकडला आहे. सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने दिलेली माहिती, फोनवरील संभाषणे आणि आरोपींच्या हालचाली यावर आधारित सखोल तपासाचा आराखडा न्यायालयासमोर मांडण्यात आला.

 Title: Deshmukh Murder Hearing: Court Summons Next on April 10

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now