सुषमा अंधारेंचं नाव घेत शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाले ‘माझ्याकडे व्हिडीओ…’

On: February 24, 2025 5:39 PM
Shushma Andhare
---Advertisement---

Sanjay Gaikwad | शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी “उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या” असा खळबळजनक दावा केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ठाकरे गटाने जोरदार आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे शिंदे गटानेही जोरदार प्रत्युत्तर देत शिवसेना ठाकरे गटावर नवे आरोप केले आहेत. (Sanjay Gaikwad)

संजय गायकवाड यांचा सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या मुद्द्यावर बोलताना, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “सुषमा अंधारे यांनी आमच्या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री शेळके (Jayshree Shelke) यांच्याकडून दोन कोटी रुपये घेऊन त्यांना उमेदवारी दिली,” असा धक्कादायक दावा गायकवाड यांनी केला.

“ठाकरे गटाला गोऱ्हेंवर टीका करण्याचा अधिकार नाही”

गायकवाड यांनी पुढे सांगितले की, “नीलम गोऱ्हे या तेव्हाच बोलतात, जेव्हा त्यांच्याकडे ठोस माहिती असते. त्यांनी केलेले आरोप हवेतून आलेले नाहीत. यापूर्वीही अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या पक्षात देवाण-घेवाणीचे आरोप केले आहेत, पण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या काळात असे कधीच घडले नाही.”

“माझ्याकडे व्हिडीओ होता, पण मी तो डिलीट केला”

गायकवाड यांनी आणखी एक मोठा दावा करत सांगितले की, “माझ्याकडे काही पुरावे होते, त्यातील एक व्हिडीओ होता, पण मी तो डिलीट केला. तरीही मी ठाणे आणि सातारा पासिंगच्या दोन मर्सिडीज बेंझ उद्धव ठाकरेंना मिळाल्याचे ठामपणे सांगू शकतो.”

संजय राऊतांवर टीका – “घाणेरड्या गोष्टी बोलण्याची त्यांना सवय”

संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “संजय राऊत यांना घाणेरड्या गोष्टी बोलण्याची सवय आहे. ते स्वतःच्या घरातील लोकांना मोठं करू शकत नाहीत, पण आता शरद पवार (Sharad Pawar) यांनाही शहाणपणा शिकवू लागले आहेत.”

राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या या आरोपांमुळे शिवसेनेतील फूट आणि दोन्ही गटांतील संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. गोऱ्हेंच्या विधानांनंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून, आता संजय गायकवाड यांच्या आरोपांवर ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Title :  Sanjay Gaikwad Targets Sushma Andhare and Uddhav Thackeray

 

Join WhatsApp Group

Join Now