संचिता उगलेचे व्हॉट्सॲप चॅट लीक; नवीन धक्कादायक माहिती समोर

On: June 17, 2026 11:35 AM
Sanchita Ugale death
---Advertisement---

Sanchita Ugale Death | अभिनेत्री संचिता उगले हिच्या दुर्दैवी निधनानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात नवनवीन खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप समोर येत आहेत. संचिता डिप्रेशनमध्ये (Depression) होती आणि तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते, याला आता तिच्या समोर आलेल्या खासगी चॅट्सवरून दुजोरा मिळत आहे. संचिताचे प्रायव्हेट चॅट लीक झाले असून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.

कौटुंबिक आरोप आणि पोलिसांचा तपास

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिताने तिच्या राहत्या घरातील एका बंद खोलीत टोकाचे पाऊल उचलले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सध्या ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद केली असून सर्व बाजूने तपास सुरू आहे. दरम्यान, तिच्या वडिलांनी इंडस्ट्रीतील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.

संचिताच्या वडिलांनी गंभीर आरोप केले की “निधनापूर्वी तिला सतत त्रास दिला जात होता. इंडस्ट्रीतील काही लोकांचा तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव होता. ती घरात नेहमी त्रस्त असायची. वरून सर्व काही ठीक दिसत असले, तरी ती आतून पूर्णपणे कोंडलेली होती. याच दबावामुळे माझ्या लेकीने स्वतःला संपवले.”

मानसशास्त्रासोबतचे व्हॉट्सॲप चॅट्स आले समोर

तपासादरम्यान संचिता आणि तिच्या सायकोलॉजिस्ट (Psychologist – मानसोपचारतज्ज्ञ) यांच्यामधील व्हॉट्सॲप चॅट्स समोर आले आहेत. या चॅट्समधून संचिताच्या मानसिक स्थितीची भीषणता कळून येते. संचिता तिच्या भविष्याबाबत अत्यंत चिंतेत आणि भीतीखाली जगत होती.

शूटिंगदरम्यान तिला तिचे संवाद (Dialogues) लक्षात ठेवण्यात मोठी अडचण येत होती. तसेच पूर्वीप्रमाणे सहज अभिनय करता येत नसल्याची खंत तिने डॉक्टरांकडे बोलून दाखवली होती. चॅट्सनुसार, उपचार सुरू असूनही तिला स्वतःमध्ये कोणताही सकारात्मक बदल जाणवत नव्हता. यावर डॉक्टरांनी तिला धीर धरण्याचा आणि खंबीर राहण्याचा सल्ला दिला होता.

Sanchita Ugale death
Sanchita Ugale death

 

एकीकडे कुटुंबीय आणि मित्र परिवार इंडस्ट्रीच्या दबावामुळे जीवन संपवल्याचा आरोप करत असताना, दुसरीकडे संचिताची सहकलाकार अभिनेत्री मेघा शर्मा हिने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मेघाने दावा केला आहे की, संचिता जानेवारी महिन्यापासूनच डिप्रेशनचा सामना करत होती, पण त्याचे कारण इंडस्ट्रीतील दबाव किंवा कामाची कमतरता हे अजिबात नव्हते.

रिपोर्टनुसार, संचिताला काही इतर अंतर्गत आरोग्य समस्या (Health Issues) होत्या, ज्यामुळे ती त्रस्त होती. मेघा पुढे म्हणाली, “तिच्यावर कामाचा कोणताही दबाव नव्हता. काम मिळणे ही तिच्यासाठी कधीच समस्या नव्हती. तिला इंडस्ट्रीकडून कोणताही त्रास किंवा छळ सहन करावा लागला नाही. या सर्व निराधार अफवा आहेत.” सध्या पोलीस या दोन्ही बाजूंचा आणि समोर आलेल्या चॅट्सचा आधार घेऊन प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

News Title: Sanchita Ugale death case private Whatsapp Chats Leak

Join WhatsApp Group

Join Now