संचिता उगले मृत्यूप्रकरणात नवीन वळण; को-स्टार उज्वल शर्माने रिलेशनशिपबाबत सोडलं मौन

On: June 16, 2026 3:27 PM
Sanchita Ugale Death
---Advertisement---

Sanchita Ugale Death Case | अभिनेत्री संचिता उगले हिने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं संपूर्ण मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तिनं हे पाऊल का उचललं? याविषयी पोलीस कसून चौकशी करत आहेत. अशातच आता संचिता उगले मृत्यूप्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. तिचा को-स्टार अभिनेता उज्वल शर्मा याने तिच्या रिलेशनशिपविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

संचिताचे तिचे को-स्टार उज्वल शर्मा (Ujwal Sharma) याच्यासोबत कथित अफेअर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. आता या सर्व अफवांवर स्वतः उज्वल शर्माने समोर येत आपली बाजू मांडली असून, धक्कादायक खुलासे केले आहेत.

‘आम्ही कधीही नात्यात नव्हतो’; को-स्टार उज्वल शर्माचा दावा

अफेअरच्या चर्चा फेटाळल्या

प्रसिद्ध मनोरंजन संकेतस्थळ ‘टेली चक्कर’ला (TellyChakkar) दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बोलताना अभिनेता उज्वल शर्माने संचितासोबतच्या अफेअरच्या वावड्या पूर्णपणे फेटाळून लावल्या. उज्वल म्हणाला, “आमच्या कथित अफेअरबद्दल सोशल मीडियावर आणि इंडस्ट्रीत पसरत असलेल्या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही. आम्ही कधीही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हतो.”

लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मानसिक तणाव

उज्वलने पुढे बोलताना संचिताच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला. तो म्हणाला, “मला मिळालेल्या माहितीनुसार, ती दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याच्यासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये (Live-In Relationship) राहत होती. ती तिच्या एक्स-बॉयफ्रेंडमुळे (Ex-Boyfriend) गेल्या काही काळापासून अत्यंत कठीण आणि मानसिक तणावाच्या परिस्थितीतून जात होती. तिच्या या मानसिक स्थितीची जाणीव असल्यामुळे मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसनेही (Production House) तिला आवश्यक ते उपचार आणि वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी व्यवस्था केली होती.” उज्वलने हेदेखील स्पष्ट केले की, तो गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून आपल्या गावी असून त्याचा संचिताशी कोणताही संपर्क नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dangal TV (@dangal_tv_channel)

‘साजन घर’ मालिकेतील को-स्टार उत्कर्ष कोहलीने व्यक्त केले दुःख

संचिताच्या अशा अचानक जाण्याने तिच्यासोबत ‘साजन घर’ (Sajan Ghar) या मालिकेत ‘विवान’ची भूमिका साकारणारा अभिनेता उत्कर्ष कोहली (Utkarsh Kohli) यालाही मोठा धक्का बसला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना उत्कर्ष म्हणाला, “मला एका मित्राकडून या दुर्दैवी घटनेबद्दल समजले. हे सर्व इतके अचानक घडले आहे की, अजूनही यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.”

संचितासोबतच्या कामाचा अनुभव सांगताना तो म्हणाला की, ती सेटवर अतिशय आनंदी आणि आपल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक असायची. ती खूपच लहान होती आणि आमची सेटवर फारशी घट्ट मैत्री नव्हती. ती काही वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्यांचा सामना करत होती, याबद्दल जुजबी माहिती होती; परंतु त्या विषयांवर सखोल चर्चा करण्याइतपत आमची जवळीक नव्हती.

पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष

संचिता उगले हिने ‘कुमकुम भाग्य’, ‘वागळे की दुनिया’, ‘साजन घर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांसह विक्की कौशल स्टारर ‘छावा’ (Chhava) या ऐतिहासिक चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. १४ जून रोजी नालासोपारा येथील राहत्या घरात तिने साडीच्या सहाय्याने गळफास लावला होता. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट न मिळाल्यामुळे आचोळे पोलीस सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील लोकांचे जबाब नोंदवून घेत आहेत. उज्वल शर्माने केलेल्या या नवीन दाव्यांमुळे पोलीस आता तिच्या ‘लिव्ह-इन’ पार्टनर आणि एक्स-बॉयफ्रेंडच्या बाजूनेही तपासाची चक्र फिरवण्याची शक्यता आहे.

News Title: Sanchita Ugale Death Case update Co Star Ujwal Sharma Statement

Join WhatsApp Group

Join Now