पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सलमान खान हळहळला, म्हणाला…

On: April 24, 2025 7:16 PM
---Advertisement---

Pahalgam Terror Attack  | जम्मू-काश्मीरमधील (Kashmir) पहलगाममध्ये येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला आहे. नुकत्याच घडलेल्या या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा जीव गेला आहे. पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. या घटनेत नवा पती गमावलेल्या एक लेफ्टनंटच्या पत्नीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

या हल्ल्यानंतर सर्वत्र संताप्त व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अनेक बाॅलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान आणि आमिर खान सारख्या मोठ्या स्टार्सनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तो म्हणतो की निष्पाप लोकांना मारणे म्हणजे संपूर्ण मानवतेला मारण्यासारखे आहे.

सलमान खानचा संताप

सलमान खानने इंस्टाग्रामवर लिहिले की, “काश्मीर, पृथ्वीवरील स्वर्ग आता नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत मी मनापासून दु:खी आहे. एका निरपराध व्यक्तीलाही मारणे म्हणजे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखे आहे.”

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. देशवासी या घृणास्पद घटनेचा निषेध करत आहेत. चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी देखील सोशल मीडिया पोस्ट शेअर करून आणि मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करून हल्ल्यांवर प्रतिक्रिया देत आहेत.

शाहरुख खान म्हणाला…

शाहरुख खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांने लिहिले की, ‘पहलगाममध्ये घडलेल्या घटनेबद्दलचे दुःख आणि राग शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. अशा वेळी आपण फक्त देवाकडे वळू शकतो आणि पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो. तुम्ही तुमच्या मनातील संवेदना व्यक्त करू शकता. चला एक राष्ट्र म्हणून एकत्र येऊया आणि खंबीरपणे उभे राहूया आणि या घृणास्पद कृत्याला न्याय मिळवून देऊया.

Title : Salman Khan reacts after Pahalgam Terror Attack 

Join WhatsApp Group

Join Now