सेलिब्रिटींसाठी वेगळा न्याय का?, सैफचा इन्शुरन्स क्लेम लगेच मंजूर, सामान्यांचा का नाही?

On: January 28, 2025 4:13 PM
Insurance Company
---Advertisement---

Insurance Company l मुंबईतील (Mumbai) एका पंचतारांकित रुग्णालयात (Five Star Hospital) उपचार घेणाऱ्या अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) तब्बल २५ लाख रुपयांचा वैद्यकीय खर्चाचा विमा दावा (Medical Claim) तत्काळ मंजूर करणाऱ्या विमा कंपनीच्या (Insurance Company) कार्यपद्धतीवर, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट (Association of Medical Consultant) या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेलिब्रिटींना (Celebrities) झुकते माप देत, विमा कंपन्या सामान्यांना मात्र हेलपाटे घ्यायला लावतात, असा आरोप या संघटनेने केला आहे.

चोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफवर, लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार करण्यात आले. उपचारांचा २५ लाख रुपयांचा दावा, विमा कंपनीने तत्काळ मंजूर केला. मात्र, सामान्यांना विमा क्लेम मंजूर करून घेताना, अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. या दुजाभावामुळे, संघटनेने विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, अर्थात आयआरडीएला (IRDAI) पत्र लिहून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सेलिब्रिटींना झुकते माप? :

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संघटनेचे १४ हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. या संघटनेने आयआरडीएला लिहिलेल्या पत्रात, कॅशलेस क्लेम (Cashless Claim), सेलिब्रिटींना दिली जाणारी झुकती माप आणि सामान्य नागरिक तसेच लहान नर्सिंग होम (Nursing Home) यांना विमा क्लेम नाकारण्याच्या प्रकारांवर बोट ठेवले आहे.

“केवळ प्रस्थापित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्याने, सैफला विशेष वागणूक देण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Insurance Company l संघटनेच्या मागण्या :

-व्यक्तीचे समाजातील स्थान विचारात न घेता, सर्व विमाधारकांना समान वागणूक दिली जावी.
-कॅशलेस उपचारादरम्यान सर्वसामान्यांचा विश्वास कायम राहील, अशा पद्धतीची पारदर्शकता असावी.
-लहान नर्सिंग होममध्ये उपचार घेणाऱ्यांना कॅशलेस क्लेम नाकारण्याचे प्रकार थांबावेत.
-विमा कंपन्यांनी सर्व विमाधारकांना समान न्याय द्यावा.

“आम्ही कोणत्याही हॉस्पिटलला किंवा कोणत्या व्यक्तीचा किती विमा दावा मान्य केला याविरोधात नाही. आमचा लढा हा, सर्वसामान्य विमाधारक आणि लहान नर्सिंग होम यांना मिळणाऱ्या दुजाभावाविरोधात आहे. केवळ नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहे, म्हणून कॅशलेस क्लेम नाकारायचा, हे धोरण चुकीचे आहे. कोणत्याही विमाधारकाला आणि कॉर्पोरेट रुग्णालयाला विशेष वागणूक देऊ नये, असे संघटनेचे मत आहे,” असे संघटनेचे चेअरमन आणि मेडिको लीगल असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे (Medico Legal Association of Medical Consultant) प्रमुख डॉ. सुधीर नाईक (Dr. Sudhir Naik) यांनी स्पष्ट केले आहे.

News Title : Saif-Ali-Khan-Insurance-Claim-Approved-Immediately-Discrimination-Allegations

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now