“देशाचा गौरव फक्त…”; डॉ. मोहन भागवत यांचं वक्तव्य चर्चेत

On: January 28, 2025 10:18 AM
Mohan Bhagwat
---Advertisement---

Mohan Bhagwat l “देश प्रगती करत असून, जगात देशाचा गौरव होत आहे. हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजग नागरिकांमुळेच शक्य होत आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक (Sarsanghchalak) डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी भिवंडी (Bhiwandi) येथे केले.

पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात (Padmashri Annasaheb Jadhav Vidyalaya and Junior College) आयोजित झेंडावंदनप्रसंगी (Flag Hoisting) ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव (Vijay Jadhav), कार्याध्यक्ष बी. डी. काळे (B. D. Kale), उपाध्यक्ष अरुणा जाधव (Aruna Jadhav), सरचिटणीस रोहित जाधव (Rohit Jadhav), शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भोईर (Shriram Bhoir) आणि मुख्याध्यापक सुधीर घागस (Sudhir Ghagas) उपस्थित होते.

Mohan Bhagwat l ‘समाजासाठी योगदान महत्त्वाचे’ :

“संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केले. आज आपण आपल्या कर्तव्यासह जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परंपरांची जपणूक करीत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म आहे. समाजाचे सहयोग घेऊन समाजासाठी कार्य करणे हाच खरा धर्म आहे,” असे डॉ. भागवत म्हणाले.

“देश पुढे जात असताना येथील भारतीयांची प्रतिष्ठा वाढली असून, कोण किती कमावते त्यापेक्षा समाजासाठी किती वाटतो यावर माणसाची प्रतिष्ठा ओळखली जाते,” असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेतर्फे विजय जाधव यांनी डॉ. भागवत यांना रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीसोबत संस्थापक अण्णासाहेब जाधव यांचे चरित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

News Title : RSS-Chief-Dr-Mohan-Bhagwat-Says-Nation-Progress-Due-To-Vigilant-Citizens

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now