मुंबईच्या संघात वाद? रोहित शर्माची नाराजी, Inside Video Viral

On: March 25, 2024 12:22 PM
Rohit Sharma
---Advertisement---

Rohit Sharma | रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागल्यापासून चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त करत आहेत. हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) घरवापसी झाली असून त्याला मुंबईच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. शुभमन गिलच्या खांद्यावर गुजरात टायटन्सच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. गुजरातने मुंबईला नमवून विजयी सलामी दिली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात यजमानांनी विजय साकारला.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील मुंबई आणि गुजरात यांच्यातील बहुचर्चित सामना रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. (MI vs GT) सामन्याला सुरुवात होताच आपल्या घरच्या मैदानावर हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

मुंबईच्या संघात वाद?

प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम रोहित रोहित असा जयघोष करत होते. हार्दिक दिसताच चाहते रोहितच्या नावाच्या घोषणांचा पाऊस पाडत होते. हार्दिक गोलंदाजीला आला तेव्हा, नाणेफेकीवेळी तसेच फलंदाजीला आला तेव्हा देखील चाहत्यांनी त्याच्यावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.

दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ज्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

 

Rohit Sharma ची नाराजी

सामन्यानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये जसप्रीत बुमराहशी चर्चा करताना दिसतो. रोहित नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच तो इतर सहकाऱ्यांना हातवारे करत काही बाबी सांगत आहे.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने 6 धावांनी बाजी मारली. मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 162 धावा करू शकला. (IPL 2024 News) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

News Title – A video of former Mumbai Indians captain Rohit Sharma being upset is going viral
महत्त्वाच्या बातम्या –

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची रणनीती; बोर्डानं घेतला मोठा निर्णय!

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू

भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

GT vs MI सामन्यात नाट्यमय घडामोडींचा पाऊस; चाहत्यांमध्ये हाणामारी, Video Viral

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार

Join WhatsApp Group

Join Now