सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार?

On: December 11, 2025 12:08 PM
Government Employees
---Advertisement---

Government Employees Retirement Age | देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार लवकरच काही मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे निश्चित आहे; मात्र आता हे वय 2 वर्षांनी वाढवण्याबाबत केंद्रात गंभीर चर्चा सुरू आहे.

सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याचा प्रस्ताव अंतिम? :

महाराष्ट्रात सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. गेली अनेक वर्षे कर्मचाऱ्यांची 60 वर्षांपर्यंत सेवा देण्याची मागणी प्रलंबित आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनीही या मागणीवर सकारात्मक निर्णय देण्याचे संकेत दिले होते. तरीदेखील अद्याप स्पष्ट पावले उचलली नसल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव आता पक्का झाल्याच्या चर्चा वेगाने सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षांपर्यंत (retirement age 62) वाढवण्याच्या तयारीत आहे आणि हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. याला मंजुरी मिळाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

Government Employees Retirement Age | कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार :

खरं तर, देशातील अनेक राज्यांनी केंद्राच्या धरतीवर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे निश्चित केलं आहे. त्यामुळे केंद्राकडून कुठलाही निर्णय घेतल्यास राज्यांनीही त्याप्रमाणे बदल करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. (Government Employees Retirement Age)

सरकार सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेलं आयुर्मान आणि सुधारलेली वैद्यकीय सुविधा. गेल्या काही वर्षांत नागरिकांचं हेल्थ प्रोफाइल सुधारलं असून, अनुभवी कर्मचाऱ्यांची कौशल्ये अधिक काळ प्रशासकीय यंत्रणेत वापरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

News Title: Retirement Age of Government Employees May Increase by 2 Years: Major Decision Expected Soon

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now