होम लोन धारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी, EMI मध्ये किती कपात होणार?

On: February 7, 2025 12:16 PM
RBI Repo Rate Cuts Home Loan EMI to Reduce
---Advertisement---

RBI Repo Rate | RBI (Reserve Bank of India) च्या MPC (Monetary Policy Committee) ने ७ फेब्रुवारी २०२५ रोजी महत्त्वाचा निर्णय घेत, पाच वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात कपात केली आहे. तीन दिवसांच्या बैठकीनंतर RBI ने ०.२५ टक्क्यांनी घट केली असून, यामुळे रेपो रेट ६.५०% वरून ६.२५% वर आला आहे. शेवटची कपात मे २०२० मध्ये झाली होती, त्यानंतर मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान २.५०% वाढ करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. (RBI Repo Rate)

होम लोन धारकांना मोठा दिलासा  

या निर्णयामुळे बँकांचे कर्जदर स्वस्त होतील आणि सर्वसामान्य नागरिकांना होम लोनवरील ईएमआयमध्ये दिलासा मिळणार आहे. रेपो दरात घट झाल्यामुळे बँकांना त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करावी लागेल. परिणामी, गृहकर्ज (Home Loan) घेणाऱ्या ग्राहकांचे मासिक हफ्ते (EMI) कमी होण्याची शक्यता आहे.

ईएमआयमध्ये किती कपात होईल?

उदाहरणार्थ, सध्या SBI (State Bank of India) चा गृहकर्जावरील व्याजदर ९.६५% आहे. रेपो रेटमधील २५ बेसिस पॉइंट्स (०.२५%) कपातीनंतर हा व्याजदर ९.४०% पर्यंत घसरू शकतो. त्याचा EMI वर असा परिणाम होईल. (RBI Repo Rate)

२५ लाखांच्या गृहकर्जावर कपात

  • मागील EMI (९.६५% दराने) : ₹२३,५४९
  • नवीन EMI (९.४०% दराने) : ₹२३,१४०
  • EMI मध्ये घट: ₹४०९ प्रति महिना

४० लाखांच्या गृहकर्जावर कपात

  • मागील EMI (९.६५% दराने) : ₹३७,६७८
  • नवीन EMI (९.४०% दराने) : ₹३७,०२४
  • EMI मध्ये घट: ₹६५४ प्रति महिना

५० लाखांच्या गृहकर्जावर कपात

  • मागील EMI (९.६५% दराने) : ₹४७,०९७
  • नवीन EMI (९.४०% दराने) : ₹४६,२८१
  • EMI मध्ये घट: ₹८१६ प्रति महिना

सामान्य नागरिकांना होणारा फायदा

ही कपात बँकांकडून लवकरच लागू केली जाणार असून, सध्याच्या आणि नवीन गृहकर्ज धारकांना याचा मोठा फायदा होईल. EMI मध्ये दर महिन्याला होणारी कपात बऱ्याच कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल. त्यामुळे नवीन गृहकर्ज घेण्याची योजना आखणाऱ्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Title : RBI Repo Rate Cuts Home Loan EMI to Reduce

 

Join WhatsApp Group

Join Now