RBI Penalty | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank) यांच्यावर लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसी (KYC) प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. (RBI Penalty)
HDFC बँकेला ₹75 लाख दंड, केवायसीतील चुका ठरल्या महागात
एचडीएफसी बँकेवर बँकिंग विनियमन अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 47A(1)(c) अंतर्गत ₹75 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. RBI ने 31 मार्च 2023 पर्यंतच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत statutory inspection (कायदेशीर तपासणी) केली होती. यावेळी बँकेने ग्राहकांचे वर्गीकरण जोखीम पातळीप्रमाणे अचूक केले नसल्याचे आढळले.
तसेच, प्रत्येक ग्राहकाला वेगळा ओळख क्रमांक देण्याच्या नियमाचे पालनही झालेले नव्हते. काही ठराविक ग्राहकांना एकच ओळख क्रमांक देण्यात आला होता, जी केवायसी मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणारी बाब ठरली. HDFC कडून प्राप्त झालेल्या उत्तरांचे परीक्षण केल्यानंतर RBI ने आरोप योग्य असल्याचे स्पष्ट केले.
पंजाब अँड सिंध बँकेवर ₹68.20 लाख दंड
पंजाब अँड सिंध बँकेवरही RBI ने बँकिंग विनियमन अधिनियमाच्या कलम 46(4)(i), 51(1), आणि 47A(1)(c) नुसार ₹68.20 लाखांचा दंड लावला आहे. यामध्ये बँकेने आर्थिक व्यवहारातील काही नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. आरबीआयने संबंधित निरीक्षण अहवालाच्या आधारे ही कारवाई केली. (RBI Penalty)
KLM Axiva Finvest वरही कारवाई, ₹10 लाख दंड
याशिवाय आरबीआयने केएलएम अॅक्सिवा फिनवेस्ट (KLM Axiva Finvest) या NBFC वरही ₹10 लाख दंडाची कारवाई केली आहे. ही कारवाईही विविध नियामक अटींच्या उल्लंघनामुळे करण्यात आली आहे.
Title : RBI Penalty to HDFC, Punjab and Sind Bank






