100-200 च्या नोटांसंदर्भात RBI ने घेतला मोठा निर्णय!

On: April 29, 2025 9:55 AM
RBI New Rule
---Advertisement---

RBI  | नोटबंदी आणि त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटांवरील निर्णयानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) आता 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व बँकांना आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना (White Label ATM Operators) नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात एटीएममधून छोट्या मूल्याच्या नोटाही सहज मिळणार आहेत.

नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व बँकांनी त्यांच्या एटीएममधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरेसा पुरवठा करण्यावर भर द्यावा. नागरिकांना मोठ्या नोटांऐवजी लहान नोटा मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला खरेदी करताना आणि व्यवहार करताना मोठा दिलासा मिळणार आहे.

30 सप्टेंबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी :

आरबीआयनं स्पष्ट केलं आहे की, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील 75 टक्के एटीएममध्ये किमान एक कॅसेट 100 किंवा 200 रुपयांच्या नोटांसाठी राखीव असणे आवश्यक आहे. यानंतर, 31 मार्च 2026 पर्यंत हा नियम 90 टक्के एटीएममध्ये बंधनकारक होईल.

याशिवाय व्हाईट लेबल एटीएम म्हणजे खासगी किंवा बिगर आर्थिक संस्थांकडून (NBFC) चालवले जाणारे एटीएम्स, ज्यामधून डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने रोख रक्कम काढणे, बॅलन्स तपासणे अशा सुविधा मिळतात.

RBI | सामान्यांसाठी सोयीचं पाऊल :

या निर्णयामुळे एटीएमवर लहान नोटांचा सहज उपलब्धता वाढेल, त्यामुळे रोजच्या व्यवहारात अडचणींना सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सकारात्मक दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

News Title: RBI Big Decision: ₹100 and ₹200 Notes Now to be Available at Most ATMs by September 2025

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now