“बलात्कार, लूटमार, दरोडे, सगळ्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम नंबर वन”

On: October 28, 2023 4:25 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | बलात्कार, लूटमार, दरोडा सगळ्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम नंबर वन आहेत. तसंच तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक लागतो, असं वक्तव्य ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी केलं आहे.

बदरुद्दीन अजमल यांनी 20 ऑक्टोबर रोजी आसामच्या गोलापारा जिल्ह्यात एका महाविद्यालयाच्या सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

लोक चंद्रावर जात आहेत, सूर्यावर यान धाडत आहेत, पीएचडी करत आहेत. एकदा जरा पोलीस स्टेशनला जाऊन बघा तिथे तुम्हाला समजेल सर्वाधिक गुन्हेगार कोण? अब्दुल रहमान, अब्दुल रहीम, अब्दुल मजीद, बदरुद्दीन, सिराजउद्दीन अशीच नावं तिथे गुन्हेगारांच्या यादीत सापडतील. ही गोष्ट क्लेशदायक नाही का?, असं ते म्हणालेत.

अजमल यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी याबाबतचं स्पष्टीकरणही दिलं आहे. मी जगभरातल्या मुस्लिम समुदायाच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षण घेण्याचं प्रमाण मुस्लिम समुदायात कमी आहे. आमची मुलं शिकत नाहीत याचं मला वाईट वाटतं. तसेच सगळ्या वाईट गोष्टींमध्ये मुस्लिम आघाडीवर आहेत ही गोष्ट खूप वेदना देणारी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now