रायगड हादरलं! प्रियकराचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, कारण ऐकून बसेल धक्का

On: February 1, 2025 5:22 PM
Suicide News
---Advertisement---

Raigad News | रायगडमधून (Raigad) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका प्रेमीयुगुलाचा (Couple) तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप (Breakup) झाला होता. याचा राग मनात धरून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या कुटुंबीयांसमोरच तिच्या गळ्यावर धारदार चाकूने (Sharp Knife) वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना पनवेलमधील (Panvel) सेक्टर अठरा येथे घडली. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात (Khandeshwar Police Station) करण्यात आली आहे. (Raigad News )

ब्रेकअपनंतर मनात संशयाचे घर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकेश शिंदे (Nikesh Shinde) आणि मृत तरुणी जागृती सत्वे (Jagruti Satve) यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध (Love Affair) होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांचा काही कारणास्तव ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपनंतर प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय प्रियकराला होता. निकेशच्या मनात संशयाने घर केले आणि रागाच्या भरात तो ३१ जानेवारीला प्रेयसी जागृती सत्वे हिच्या घरी गेला. तू दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस, असे बजावत त्याने तिच्याशी वाद घातला आणि तिला शिवीगाळ तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी जागृतीच्या घरी तिची आई आणि बहीण देखील उपस्थित होत्या.

प्रेयसीची हत्या आणि स्वतःवरही वार

वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त प्रियकर निकेशने जागृतीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या (Murder) केली. या हल्ल्यात जागृतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर निकेशने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर देखील वार करून घेतले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे (MGM Hospital, Kamothe) येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच खान्देश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हत्येचे कारण काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, निकेश आणि जागृती यांच्यात ब्रेकअप झाल्यानंतरही निकेशला जागृतीने दुसऱ्या मुलासोबत बोलणे पसंत नव्हते. याच संशयातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी निकेश शिंदे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलीस त्याची कसून चौकशी करतील आणि हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल. (Raigad News )

Title : Raigad News Man Kills Ex-Girlfriend After Breakup Attempts Suicide

 

Join WhatsApp Group

Join Now