मुंबई | पंंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अहमदाबादच्या यूएन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी राजकारण बाजूला सारून मोदींसाठी एक भावनिक ट्विट केलं आहे. सध्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आई आणि मुलाचं नातं खूप अनमोल असतं. मोदीजी या कठीण प्रसंगात मी तुमच्यासोबत आहे. तुमच्या मातोश्री लवकर बऱ्या होवो, यासाठी मी प्रार्थना करतो.
यूएन रूग्णालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. या निवेदनात मोदींच्या मातोश्रींना रूग्णालयात दाखल करण्याची माहिती दिली होती. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, जूनमध्ये मोदींनी त्यांच्या आईचा 100 वा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्तान त्यांनी आईचे पाय धुवून आशिर्वाद घेतला होता.
महत्वाच्या बातम्या-







