‘गौतमीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी…’, गौतमीच्या समर्थक संघटनेचा गंभीर इशारा

On: December 28, 2022 4:32 PM
---Advertisement---

सांगली | सध्या लावणी(Lavani) म्हटलं की गौतमी पाटीलचं(Gautami Patil) नाव समोर येत आहे. गौतमीच्या लावणीची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तिच्या लावणीचे कार्यक्रम पाहण्यास लावणीप्रेमी मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात.

गौतमीचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. पण असं असलं तरी गौतमीच्या लावणीचे कार्यक्रम बंद करण्याची मागणी अनेकजण करत आहे.

काही लावणी कलाकार आणि संघटनांकडून तिच्यावर अश्लिलतेचे आरोप झाले आहेत. त्यामुळं तिच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी या संघटना आणि काही लावणी कलावंत करत आहेत.

परंतु गौतमीचे समर्थक असलेल्या दलित महासंघटनेने मात्र गौतमीला पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी दलित महासंघटनेने निदर्शने केली आहेत.

गौतमीला पोलिस बंदोबस्त द्या, नाहीतर दलित महासंघटनेच्या युवकांसोबत तिच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त करू, असा इशाराचा आता संघटनेने दिला आहे.

दरम्यान, एका ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम पाहायला आल्यानंतर एका व्यक्तीचा चेंगरून मृत्यू झाला होता. यावेळी गौतमीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now