“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली

On: March 18, 2024 9:22 AM
Rahul Gandhi
---Advertisement---

Rahul Gandhi | रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली. देशभरातील दिग्गज नेते या सभेसाठी मुंबईत उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुंबईत त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप करत भाजपवर टीकास्त्र सोडले. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा चेहरा भाजपवासी झाल्याचा दाखला देत एक किस्सा सांगितला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचे नाव न घेता राहुल गांधींनी टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला आहे, मी त्यांचे नाव घेणार नाही. पण ते का गेले याची सर्वांना कल्पना आहे. केंद्रीय तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी त्यांनी कमळ हाती घेतले आहे.

मुंबईत जाहीर सभा

मुंबईत मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही एका हुकुमशाही विरोधात लढत आहोत. आता प्रश्न असा आहे की ती शक्ती काय आहे. राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी (अंमलबजावणी संचालनालय), सीबीआय, आयकर विभागामध्ये आहे. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी भाजपवर टीकेचे बाण सोडले.

“मला नाव घ्यायचे नाही, पण या महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मग रडत रडत ते माझ्या आईला म्हणाले की, सोनियाजी, मला सांगायला लाज वाटते, माझ्यात त्यांच्याशी लढण्याची ताकद नाही. मला तुरुंगात जायचे नाही. मला खूप त्रास सहन करावा लागला आहे”, असे राहुल गांधींनी नमूद केले. एकूणच गांधींची ही टीका अशोक चव्हाण यांच्यावर होती.

Rahul Gandhi यांचा हल्लाबोल

मिलिंद देवरा यांच्यानंतर लगेचच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचा दाखला देत तिकडे वॉशिंग मशीन आहे असे राहुल गांधींनी म्हटले. खरं तर अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मतभेद होते. संसदेत मांडलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख हे अशोक चव्हाण यांच्या जाण्यामागचे कारण असल्याचे नाना पटोले म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध तीन खटले प्रलंबित असून, त्यापैकी दोन आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित आहेत. अशोक चव्हाण 2000 मध्ये राज्याचे महसूल मंत्री असताना कुलाब्यातील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी जमिनीचे बेकायदेशीरपणे वाटप करण्यात आले होते.

News Title- congress mp Rahul Gandhi criticizes bjp leader Ashok Chavan

महत्त्वाच्या बातम्या –

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!

Join WhatsApp Group

Join Now