सर्वात मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू

On: January 5, 2024 4:18 PM
Sharad Mohol
---Advertisement---

पुणे | पुण्यातील कुख्यात गुंड Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुणे शहरात भरदिवसा गोळीबार झाला होता. या घटनेत शरद मोहोळला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Mohol चा गोळीबारात मृत्यू

शरद मोहोळ याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

नेमकं काय घडलं?

शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

कोण आहे शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mohammed Siraj आणि Jasprit Bumrah यांचा ‘ब्रो-मान्स’, ही दोस्ती तुटायची नाय!

‘कोण कोणामुळे निवडून आलंय…’, Ajit Pawar यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Rohit Pawar | मोठी बातमी! बारामती ॲग्रोवर ईडीचा छापा; रोहित पवार अडचणीत

Vivo X100 Series l जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह Vivo X100 सीरिज लाँच

Manoj Jarange | जरांगे पाटलांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now