Pimpri Chinchwad News | पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवड परिसरात एका महिलेनं तिच्या पतीवर लैंगिक अत्याचार आणि जादूटोण्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. पतीनं जबरदस्तीने संबंध ठेवत तिच्या प्रायव्हेट पार्टवर हळद-कुंकवात भिजवलेला लिंबू पिळल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लग्नानंतर सुरू झाला संशयाचा खेळ-
पीडित महिला आणि आरोपी पती यांचा विवाह २००४ मध्ये झाला होता. लग्नानंतर पती सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे घरात सतत वाद होत असे. डिसेंबर २०२३ मध्ये महिला मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. पुढे २०२४ मध्ये तिने न्यायालयात भरणपोषणासाठी केस दाखल केली होती.
१ जून २०२४ रोजी महिला मुलाचे पुस्तके व गादी घेण्यासाठी पतीच्या फ्लॅटमध्ये गेली होती. त्याच वेळी पती तेथे आला आणि दरवाजा बंद करत तिला चाकू दाखवत कपडे काढायला भाग पाडले. त्यानंतर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले, असा आरोप महिलेने केला आहे.
लिंबातून जादूटोणा, जीवे मारण्याची धमकी
पीडितेच्या म्हणण्यानुसार अत्याचारानंतर पतीने हळद-कुंकवात भिजवलेला लिंबू तिच्या प्रायव्हेट पार्टवर पिळला आणि सांगितलं, “मी तुझ्यावर जादू केलं आहे, आता तू वेडी होशील.” तसेच कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी (Sangvi Police Station) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Title: Pune Woman Alleges Marital Rape, Black Magic






