Pahalgam Attack Experience l पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्याने देशभरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटक मृत्युमुखी पडले, तर काही गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींपैकी एक पुणेकर महिला पर्यटक आसावरी जगदाळे यांनी अनुभवलेला प्रसंग थरकाप उडवणारा ठरला आहे. (Pahalgam Attack Experience)
त्या म्हणाल्या, “नाक्यानाक्यावर चेकपोस्ट आहेत, पण जिथं खरंच गरज होती तिथं आमच्यासाठी ना पोलीस होते, ना सैन्य. आम्ही मदतीसाठी ओरडत होतो पण कोणीच नव्हतं.” त्यांच्या वडिलांनाही गोळी लागली असून उपचार सुरू आहेत. या घटनेचा उल्लेख करताना आसावरी यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
“सामान्यांना का भोगावं लागतं?” – धर्माच्या नावावरचे वाद अन् पीडितांचे प्रश्न :
आसावरी पुढे म्हणाल्या, “हिंदू-मुस्लीम वादामध्ये काही वाईट प्रवृत्तीमुळे सामान्य लोकांना फेस करावं लागतं. आम्ही कुठल्या राजकारणासाठी फिरायला आलो नव्हतो. आम्ही सुट्टीसाठी आलो होतो आणि आमच्यावर ही वेळ आली.” त्यांच्या या भावनिक शब्दांनी समाजातील धार्मिक ऐक्य, असुरक्षितता आणि राजकीय उदासीनतेचा मुद्दा अधोरेखित केला. (Pahalgam Attack Experience)
तिथं उपस्थित असलेल्या काही पर्यटकांनी देखील सांगितलं की, “हल्ल्याच्या क्षणी कुठेच सुरक्षा यंत्रणा दिसल्या नाहीत. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी लोकांना गोळ्या लागताना पाहिलं.” ही बाब विशेषतः गंभीर आहे कारण काश्मीरसारख्या अतिसंवेदनशील भागात सुरक्षेच्या नावाने अनेक चेकपोस्ट असतात, पण गरजेच्या वेळी त्यांची अनुपस्थिती भीषण ठरली.
Pahalgam Attack Experience l सरकारकडे मागणी – “लवकरात लवकर आम्हाला बाहेर काढा” :
आसावरी जगदाळे (Aasavari Jagdale) आणि इतर जखमी पर्यटकांनी सरकारकडे मागणी केली आहे की, “लवकरात लवकर सर्व अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढावं. परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे आणि आमच्यासोबत लहान मुलेही आहेत.”






