शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना, 26 वर्षीय तरुणीसोबत पहाटे 5.30 वाजता काय घडलं?

On: February 26, 2025 2:43 PM
pune news
---Advertisement---

Pune News | पुण्यातील स्वारगेट बसस्थानक (Swargate Bus Station) परिसरात एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना

पीडित तरुणी पुण्याहून (Pune News)  फलटण (Phaltan) येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. मात्र, तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तरीही त्या व्यक्तीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला फसवले आणि जवळच उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

या घटनेने हादरलेल्या तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून सर्व घटना सांगितली. मित्राने तिला तातडीने स्वारगेट पोलीस ठाणे (Swargate Police Station) गाठण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार, पोलिसांचा शोध सुरू

स्वारगेट बसस्थानक परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपी ओळख पटली असून, त्याचे नाव दत्तात्रय रामदास गाडे (Dattatray Ramdas Gade) असल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, गाडे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर (Shikrapur) आणि शिरूर (Shirur) पोलीस ठाण्यात पूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत.

पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात निघाले असून, तो अद्याप फरार आहे. पुण्यासारख्या (Pune News) मोठ्या शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही घटना कशी घडली?

स्वारगेट बसस्थानक हे शहरातील सर्वाधिक सुरक्षित आणि गजबजलेले बसस्थानक मानले जाते. येथे 24 तास प्रवाशांची मोठी वर्दळ असते, तरीही हा प्रकार घडला, यावरून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

गंभीर बाब म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही त्या तरुणीला कोणी मदत केली नाही, असा आरोप देखील केला जात आहे. या घटनेमुळे समाजाची मानसिकता आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

News Title : pune news Woman Raped in Shivshahi Bus at Swargate

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now