‘थकबाकी न भरल्यास…’; जलसंपदा विभागाचा पुणे महानगरपालिकेला इशारा

On: February 14, 2025 9:49 AM
Pune News Water Cut Threat Looms Over Pune Over Unpaid Dues
---Advertisement---

Pune News | जलसंपदा विभागाने पुणे (Pune) महानगरपालिकेला (Municipal Corporation) पाणीपट्टी थकबाकी भरण्याबाबत इशारा दिला आहे. थकबाकी न भरल्यास, पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पाच्या (Khadakwasla Project) कार्यकारी अभियंता श्वेता कुन्हाडे (Shweta Kunhade) यांनी या संदर्भात महापालिकेला नोटीस बजावली आहे.(Pune News )

पाणीपट्टी थकबाकीचा तपशील

पुणे महानगरपालिकेने २०१६ पासून खडकवासला धरणातून पाणी वापरले आहे, पण त्याची पाणीपट्टी भरलेली नाही. नियमापेक्षा जास्त पाणी वापरल्याबद्दल दंड भरण्याची गरज होती, तोही भरलेला नाही. २०१४ पासून प्रक्रिया केलेले पाणी जलसंपदा विभागाला दिलेले नाही.

जलसंपदा विभागाने महानगरपालिकेकडे चालू वर्षाची १७३.८५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी दर्शवली आहे. त्यामुळे, जलसंपदा विभागाने एकूण ७१४ कोटी ६० लाख रुपयांच्या थकबाकीची नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेने २०० कोटी रुपये त्वरित जमा करावेत,अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली होती.

पाणी कपातीचा इशारा

जलसंपदा विभागाने २५ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी जमा न केल्यास, टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा कमी करण्याचा इशारा दिला आहे. महापालिका पाणी औद्योगिक वापरासाठी वापरत नसल्याचा दावा करत असली, तरी मंगळवार पेठेतील जलसंपदा विभागाचे कार्यालय दरवर्षी ६० हजार रुपये पाणीपट्टी भरते, जी वाणिज्यिक प्रकारात मोडते. (Pune News )

जलसंपदा विभागाने पुणे शहराला खडकवासला धरणातून ११.५० टीएमसी (TMC)पाणी कोटा मंजूर केला आहे; पण महापालिका यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे. थकबाकी जमा केल्यानंतरच धरणांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने कळवले आहे. महापालिका भामा आसखेड प्रकल्पातूनही पाणी उचलत असते, त्याची थकबाकी १२९ कोटी रुपये आहे.

Title : Pune News Water Cut Threat Looms Over Pune Over Unpaid Dues

 

Join WhatsApp Group

Join Now