Pune News | वडगाव शेरी (Wadgaon Sheri) मतदारसंघातील सर्व भागांना नळाद्वारे सुनियोजित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. येत्या वर्षभरात वडगाव शेरी मतदारसंघ टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आमदार बापू पठारे यांनी दिली आहे. महापालिका (Municipal Corporation) येरवडा (Yerwada) क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. (Pune News )
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
या बैठकीला आमदार पठारे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap), अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, झोन एकचे उपायुक्त राजीव नंदकर, अधीक्षक प्रकल्प अभियंता श्रीकांत वायदंडे, कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर आणि अधिकारी उपस्थित होते. वडगाव शेरी मतदारसंघात आजही अनेक भागांत नागरिकांना विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने त्रास सहन करावा लागतो.
लोहगाव भागातील पाणी समस्या
पालिकेत समावेश झालेल्या लोहगाव (Lohgaon) परिसराला अजूनही नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे लोहगावकरांना टँकरद्वारे मिळणारे, वापराचे पाणी घरातील ‘आरओ’ (RO) मशिनमधून शुद्ध करून पिण्यायोग्य करून घ्यावे लागते. येरवड्यात ४० वर्षांपूर्वीच्या भूमिगत जुन्या जलवाहिन्या असल्याने अशुद्ध व दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येरवड्यातील जलवाहिन्या बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील आमदारांनी आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्याकडे केली. (Pune News )
पाणी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना
पाणी सोडणारे वॉलमन जर पैशांची मागणी करत असतील, तर नागरिकांनी थेट आमदार बापू पठारे अथवा पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.
मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘वर्षभरात वडगावशेरी भागाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. लोहगावमधील पोरवाल रस्ता परिसर, निंबाळकरनगर, साठे वस्ती, स्वामी समर्थनगर या भागांना येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत तर १५ मार्चपर्यंत डीवाय पाटील रस्ता परिसर, चिरके कॉलनी, पठारे वस्ती, आदर्शनगर, गणेशनगर, कर्मभूमीनगर, लेक व्ह्यू, खांदवेनगर यांसह लोहगाव पूर्व भागाला पूर्ण क्षमतेने पाणी दिले जाईल.’
येत्या २५ मेपर्यंत धानोरी डोंगर परिसर, सहारा परिसर, न्याती बिल्डिंग परिसरात जलवाहिन्या टाकून नियमित पाणी देणार, असल्याचे शाखा अभियंता सुधीर अलूरकर यांनी स्पष्ट केले. (Pune News )
Title : Pune News Tanker-Free Constituency in a Year MLA Bapu Pathare on Wadgaon Sheri






