Pune News | निगडी प्राधिकरणातील (Nigdi Pradhikaran) सेक्टर २४ (Sector 24) मधील संत कबीर उद्यानात (Sant Kabir Udyan) रविवारी सकाळी बिबट्या (Leopard) शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग (Forest Department), ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ (RESCUE Charitable Trust), पोलीस (Police) आणि अग्निशमन दल (Fire Brigade) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सव्वादोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद (Captured) करण्यात आले. (Pune News)
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सकाळी नऊच्या सुमारास नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सुरुवातीला एक नाही तर तीन बिबटे (Three Leopards) असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. समाजमाध्यमांवरही (Social Media) याबाबतचे मेसेज फिरू लागले. मात्र, वन विभागाने या भागात एकच बिबट्या असून त्याला पकडल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर (Rumors) विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
थरारक रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation)
वन विभागाला माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक दीपक पवार (Deepak Pawar) आणि वन कर्मचारी यांच्यासह ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’च्या नेहा पंचमिया (Neha Panchmiya) यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. ‘डार्ट गन’चा (Dart Gun) वापर करून बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन (Injection) देण्यात आले आणि त्यानंतर त्याला पिंजऱ्यात (Cage) कैद करण्यात आले. या मोहिमेत पशुवैद्यक डॉ. कल्याणी ठाकूर (Dr. Kalyani Thakur) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Pune News)
बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी हलवले
पकडलेला बिबट्या नर जातीचा (Male Leopard) आणि पूर्ण वाढ झालेला आहे. त्याला सध्या बावधन (Bavdhan) येथील वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात (Wildlife Treatment Center) वैद्यकीय तपासणी (Medical Examination) आणि उपचारासाठी (Treatment) निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शीचा थरारक अनुभव
“तुमच्या घराची दारे लावून घ्या. घराच्या आवारात बिबट्या आला आहे…” असा फोन आल्यावर क्षणभर आश्चर्य वाटले, पण अलीकडे बिबट्या रहिवासी क्षेत्रात येत असल्याच्या बातम्या सातत्याने कानावर येत असल्याने मी पटकन सगळी दारे, खिडक्या लावून घेतल्या. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून अंदाज घेत होतो, तेवढ्यात कुंपणावरून उडी मारून बिबट्या शेजारच्या बंगल्यात शिरला,” असा थरारक अनुभव प्रत्यक्षदर्शी विशाल सोनिग्रा (Vishal Sonigra) यांनी सांगितला.
वन विभागाची तत्परता
या मोहिमेत उपवनसंरक्षक महादेव मोहिते (Mahadev Mohite) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, वनपाल विद्याधर गांधिले, विजय शिंदे, सुरेश बलों, कृष्णा हक्के, मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे, अग्निशमन विभागाचे अधिकारी अनिल डिंबळे, सारंग मंगरुळकर, अनिल माने, राजेश साखळे यांनी सहभाग घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता, अशा प्रसंगी वन विभागाला त्वरित कळवावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. (Pune News)
वन्यजीवांसंदर्भात माहिती मिळाल्यास काय करावे?
रहिवासी क्षेत्रामध्ये वन्यजीवांसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ ‘१९२६’ या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (Toll Free Number) संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाकडून (Pune Forest Department) करण्यात आले आहे.
Title: Pune News Leopard Creates Panic in Nigdi Pradhikaran






