Pune Crime l पुण्यातून (Pune) एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका शाळकरी विद्यार्थ्याने (School Student) त्याच्याच शाळेतील एका विद्यार्थिनीवर (Girl Student) बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) करण्यासाठी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला चक्क 100 रुपयांची सुपारी (Contract Killing) दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
एका शाळकरी विद्यार्थ्याने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याला 100 रुपये दिले होते. दौंड तहसीलमधील (Daund Tehsil) सेंट सेबॅस्टियन इंग्लिश स्कूलमधील (St. Sebastian English School) एका विद्यार्थिनीने शिक्षकांना (Teachers) सांगितले की, एका विद्यार्थ्याने त्याच्या पालकांच्या (Parents) बनावट सह्या (Fake Signatures) केल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्याला भीती होती की, ही बाब शाळेतील इतर कोणाला समजेल. त्यामुळे तो संतापला आणि त्याने दुसऱ्या वर्गातील एका विद्यार्थ्याला 100 रुपये देऊन त्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यास सांगितले.
शाळेची प्रतिष्ठा (Reputation) वाचवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक (Principal) आणि शिक्षकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Police) या प्रकरणी तक्रार (Complaint) दाखल केली आहे.
बोर्डिंग स्कूल बंद करण्यासाठी 13 वर्षीय मुलाने केली होती 9 वर्षीय मुलाची हत्या :
गेल्या महिन्यातच उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras) येथून एका 13 वर्षांच्या मुलाला अटक (Arrest) करण्यात आली होती. त्याने एका 9 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती. चौकशीदरम्यान असे आढळून आले की, आरोपीने ही हत्या अशासाठी केली होती की, बोर्डिंग स्कूल (Boarding School) बंद व्हावे आणि तो घरी जाऊ शकेल.
पोलिसांनी सांगितले की, 26 सप्टेंबर रोजी शाळेच्या संचालकांच्या (Director) गाडीच्या मागच्या सीटवर 9 वर्षांच्या मुलाचा मृतदेह (Dead Body) आढळला होता. प्रथमदर्शनी संशय संचालकावर गेला. लोकांना वाटले की, त्याने कुटुंबातील समस्या सोडवण्यासाठी आणि शाळेचे नाव प्रसिद्ध करण्यासाठी मुलाचा बळी दिला. नंतर असे उघडकीस आले की, एक मुलगा शाळा कशी बंद होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्याने विद्यार्थ्याचा टॉवेलने (Towel) गळा दाबून खून केला होता.
या दोन्ही घटनांमुळे शाळकरी मुलांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त होत आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे.






