Mahakumbh l प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये (Mahakumbh) मौनी अमावस्येला (Mauni Amavasya) अमृतस्नान करण्यासाठी भाविकांची (Devotees) मोठी गर्दी जमली होती. याच दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 50 हून अधिक जण जखमी (Injured) झाले असून, काही जण बेपत्ताही (Missing) आहेत. आपल्या प्रियजनांच्या शोधात अनेक जण भटकताना दिसत आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूर (Chhatarpur) येथील एक तरुणही आपल्या आईचा शोध घेत आहे.
Mahakumbh l तरूणाकडून बेपत्ता आईचा शोध :
मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम (Bageshwar Dham) म्हणजेच छतरपूर जिल्ह्यातून महाकुंभला पोहोचलेल्या जयप्रकाशने आपला अनुभव सांगितला. “रात्री एक वाजेच्या सुमारास इतकी गर्दी जमली की लोक एकमेकांवर चढू लागले. अनेक लोक खाली दबले गेले. मी अनेकांना बाहेर काढले. पण, मला आईला बाहेर काढता आले नाही.
अनेक कुटुंबीय देखील गर्दीत दबले गेले. त्यापैकी काही बाहेर आले, पण आई खाली दबली गेली. तिला खूप उशिराने बाहेर काढले, तेव्हा तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका (Ambulance) आली आणि जखमी आईला रुग्णालयात पाठवण्यात आले,” असे जयप्रकाशने सांगितले.
मात्र, या घटनेला जवळपास 8 ते 9 तास उलटून गेल्यानंतरही जयप्रकाश सोनी (Jayprakash Soni) यांच्या आईचा अद्याप शोध लागलेला नाही. जेव्हा ते सेंट्रल हॉस्पिटलमध्ये (Central Hospital) पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या आईला मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) नेण्यात आले आहे. त्यानंतर ते मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. पण, तिथेही त्यांच्या आईचा काही पत्ता लागलेला नाही.
मंगळवारी मध्यरात्री भाविकांची मोठी गर्दी संगमाच्या (Sangam) दिशेने आली. बुधवारी (29 जानेवारी) मौनी अमावस्येला संगमात स्नान करण्यासाठी 10 कोटी लोक येतील अशी अपेक्षा होती आणि तसेच झाले. यावेळी येण्या-जाण्यासाठी एकच गेट (Gate) असल्याने गर्दी वाढली आणि धक्काबुक्की झाली. त्यातूनच चेंगराचेंगरीची भयंकर घटना घडली. लोक खाली पडले आणि इतर लोक त्यांच्या अंगावरून गेले. यामध्ये अनेकांना दुखापत झाली तर काहींचा मृत्यूही झाला. अद्याप या दुर्घटनेतील मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठ्या धार्मिक उत्सवांमध्ये गर्दी व्यवस्थापनाचा (Crowd Management) प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.






