Prayagraj Mahakumbh 2025 | उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभला (Mahakumbh) मंगळवारी (28 जानेवारी) रात्री उशिरा घडलेल्या चेंगराचेंगरीच्या (Stampede) घटनेने गालबोट लागले आहे. संगमावर (Sangam) झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकृत आकडा अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. अनेक जण जखमी झाले असून त्यांना कुंभ परिसरातील सेक्टर 2 मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Prayagraj Mahakumbh 2025)
28 जानेवारीच्या मध्यरात्री प्रयागराजच्या संगम काठावर ही चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किती भाविकांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले, याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
चेंगराचेंगरीनंतरची भयावह परिस्थिती
चेंगराचेंगरीनंतर घटनास्थळी अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. फोटोंनुसार, लोकांचे सामान, कपडे, बूट, चप्पल सर्वत्र विखुरलेले होते. जखमी लोक जमिनीवर विव्हळत होते, तर मृतदेहाजवळ त्यांचे नातेवाईक आक्रोश करताना दिसत होते. अनेक जण आपल्या प्रियजनांचा शोध घेत होते, तर काहींनी आपल्या प्रियजनांच्या मृतदेहाचा हात घट्ट पकडून ठेवला होता, जेणेकरून गर्दीत ते हरवू नयेत. बचाव पथकाचे कर्मचारी मृतदेह घेऊन जात असतानाही एका व्यक्तीने आपल्या प्रिय व्यक्तीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. (Prayagraj Mahakumbh 2025)
या घटनेनंतर सर्वत्र हाहाकार माजला होता. बचावकार्य (Rescue Operation) युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
या घटनेवेळी तेथे उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला थरारक अनुभव सांगितला. बिहारच्या (Bihar) औरंगाबाद (Aurangabad) येथील सूरज यादव (Suraj Yadav) यांनी सांगितले की, ते 12-13 जण गंगेत स्नान करण्यासाठी आले होते. तेवढ्यात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात त्यांची आई चिरडली गेली.
या घटनेत पत्नी गमावलेल्या फुलचंद विश्वकर्मा (Fulchand Vishwakarma) यांनी सांगितले की, रात्री गंगेत स्नान करून बाहेर आल्यानंतर त्यांना एका बाजूचे गेट उघडलेले दिसले. दोन्ही बाजूंनी लोक होते. लोक एकमेकांना तुडवत होते. या चेंगराचेंगरीत त्यांची पत्नी मरण पावली आणि ते स्वतः अर्धा तास गर्दीखाली दबून होते. औरंगाबादहून आलेल्या विनय कुमार (Vinay Kumar) नावाच्या व्यक्तीने सांगितले की, काही लोक घाटाकडे जात होते. दरम्यान, पुढे गेलेले काही लोक मागे सरकू लागले. तेथून जाणाऱ्या लोकांनी धक्काबुक्की केली आणि मग चेंगराचेंगरी झाली. कोणीही बाहेर पडू शकले नाही. त्या ठिकाणी पोलिसही (Police) नव्हते. एक व्यक्ती पडला आणि त्याच्यावर आणखी माणसे पडत राहिली. त्यातच ते मरण पावले. (Prayagraj Mahakumbh 2025)
Title : Prayagraj Mahakumbh 2025 Stampede 10 Dead Many Injured Death Toll May Rise






