महाकुंभमेळा ठरला जागतिक विक्रम नोंदवणारा सोहळा, केले ‘हे’ तीन नवे विक्रम

On: February 28, 2025 12:24 PM
Mahakumbh Mela
---Advertisement---

Mahakumbh Mela l उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे आयोजित महाकुंभमेळा एक ऐतिहासिक घटना ठरली. या महाकुंभमेळ्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) तीन नवीन विक्रम नोंदवले आहेत. गुरुवारी या महाकुंभाचा समारोप झाला.

स्वच्छता, चित्रकला आणि झाडू मोहिमेत विक्रम :

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम संगमाच्या काठावर पोहोचली आणि तेथे त्यांनी या विक्रमांची घोषणा केली. महाकुंभमेळ्यात एकूण चार नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी ३ विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. या महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटच्या स्नानाने झाला.

या विशेष कार्यक्रमाची जगभरात चर्चा झाली, कारण जगभरातील लोकांनी यापूर्वी कधीही श्रद्धेचा इतका मोठा सोहळा पाहिला नव्हता. संबंधित अधिकाऱ्यांनी ३ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सादर केले आणि या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला.

Mahakumbh Mela l तीन जागतिक विक्रम :

गंगा स्वच्छता: ३६० स्वयंसेवकांनी मिळून ४ वेगवेगळ्या ठिकाणी गंगा स्वच्छता मोहीम राबवली.
सामूहिक चित्रकला: १०,१०२ लोकांनी एकत्रितपणे चित्रे रंगवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
झाडू मोहीम: स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी एकाच वेळी १९,००० लोकांनी झाडू मारून स्वच्छता मोहीम पूर्ण केली.

या महाकुंभमेळ्यात सहभागी झालेल्या भाविकांची संख्या ६६.३० कोटींहून अधिक होती. हा मेळावा ४,००० हेक्टर क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता आणि ७०,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी ४५ दिवसांत १० वेळा या मेळाव्याला भेट दिली. १३,००० हून अधिक तंबू उभारण्यात आले आणि १.५ लाख शौचालये बांधण्यात आली होती. ७० हून अधिक देशांतील ५० लाखांहून अधिक विदेशी भाविकांनी प्रयागराजला भेट दिली. रेल्वे प्रशासनाने १३,००० ट्रेन चालवण्याचे नियोजन केले होते, प्रत्यक्षात १६,००० हून अधिक ट्रेन चालवण्यात आल्या.

News title : Prayagraj Maha Kumbh Mela Sets 3 World Records

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now