Pravin Tarde Emotional l काश्मीरच्या पहलगाममध्ये (pahalgam attack) 22 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्यात 28 निरपराध पर्यटकांचा बळी गेला, अनेक जण गंभीर जखमी झाले. धर्म विचारून, ओळख पटवून केलेल्या या निर्दय गोळीबाराने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेने मराठी सिनेविश्वालाही हादरवले आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे (pravin tarade) यांचा जिवलग मित्र संतोष जगदाळे याच हल्ल्यात हुतात्मा झाला. या बातमीने प्रविण तरडे भावुक झाले असून त्यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
“माफ कर मित्रा… आम्ही काही करू शकलो नाही” :
प्रविण तरडे यांनी लिहिलं – “आतंकवाद आज घरात आला… माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष, माफ कर आम्हाला. आम्ही काही करू शकत नाही.” ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांनी कमेंट्समधून संतोषला श्रद्धांजली वाहताना आपला शोक व्यक्त केला आहे.
संतोष जगदाळे हे पुण्यातील रहिवासी होते. पहलगामला पर्यटनासाठी गेले असताना, हल्लेखोरांनी धर्म विचारून त्यांना लक्ष्य केलं. गोळ्या झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Pravin Tarde Emotional l पाकिस्तानातून चालवला जात होता हल्ला? :
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे पाकिस्तानातून सूचना मिळत होत्या, अशी माहिती तपासात समोर आली आहे. हल्लेखोरांनी अशा भागात हल्ला केला जिथे पोलिस आणि सुरक्षाबळ कमी होते. (Pravin Tarde Emotional)
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत मिळाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. या गटाचं नेतृत्व करणारा मुख्य दहशतवादी काही काळापूर्वीच पाकिस्तानातून भारतात शिरला होता आणि त्याचे थेट संपर्क पाकिस्तानमधील ‘बॉस’सोबत होते. दरम्यान, ही घटना ‘द काश्मीर फाईल्स’सारख्या सिनेमातून दाखवलेली स्थिती प्रत्यक्षात किती भयावह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी आहे. (Pravin Tarde Emotional)






