‘सेक्स ही गरज आहे, तुला वेदना झाल्यातरी…’; अब्जाधीश प्रसन्ना शंकरच्या बायकोच्या खुलाशाने खळबळ

On: April 8, 2025 12:15 PM
prasanna shankar wife
---Advertisement---

Prasanna Shankar | ग्लोबल टेक कंपनी ‘रिप्लिंग’चे (Rippling) सह-संस्थापक आणि अब्जाधीश प्रसन्ना शंकर (Prasanna Shankar) यांच्यावर त्यांची पत्नी दिव्या शशिधर (Divya Shashidhar) यांनी घटस्फोटाच्या अर्जात (Divorce Petition) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतरही बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणे, वेश्यांशी संपर्क साधणे आणि ओपन मॅरेजसाठी (Open Marriage) दबाव टाकल्याचा दावा दिव्या यांनी केला आहे. या दोघांमधील घटस्फोटाची लढाई सध्या सुरू असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

‘सॅन फ्रॅन्सिको स्टँडर्ड’च्या (‘San Francisco Standard’) रिपोर्टनुसार, दिव्या शशिधर यांनी आपल्या घटस्फोटाच्या अर्जात प्रसन्ना शंकर यांच्या वागणुकीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसन्ना शंकर त्यांच्यावर ‘ओपन मॅरेज’साठी दबाव टाकत होते. इतकेच नाही, तर आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी घरात छुपे कॅमेरे (Hidden Cameras) लावल्याचा आरोपही दिव्या यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पतीसाठी आपण आपले करिअर सोडले. २०१६ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर लगेचच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पतीने आपल्याला मजबूर केले. आपण नकार दिला असता, “सेक्स ही माझ्यासाठी मुलभूत गरज आहे, तुला हे करावेच लागेल, तुला किती वेदना होतील याची मला पर्वा नाही,” असे पतीने म्हटल्याचा दावा दिव्या यांनी केला आहे.

“जर तू हे करू दिलं नाहीस, तर मी बाहेर जाऊन हे काम करेन,” अशी धमकीही पतीने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिव्या यांनी डिसेंबर २०१९ मध्ये प्रसन्ना शंकर यांनी पाठवलेल्या एका ईमेलचा हवालाही दिला आहे, ज्यात त्यांनी कथितरित्या अनेक वेश्यांशी (Prostitutes) संपर्क साधून त्यांचे फोटो आणि दर मागितले होते. याशिवाय, प्रसन्ना शंकर हे पती आणि वडील म्हणून निष्काळजी होते, घरी आल्यावरही ते लॅपटॉपवर काम करत असायचे आणि कुटुंबाला कमी वेळ देऊनही कायम सेक्सची मागणी करत असत, असेही आरोप दिव्या यांनी केले आहेत.

प्रसन्ना शंकरचे प्रत्यारोप आणि नात्याची पार्श्वभूमी

दिव्या शशिधर यांनी हे आरोप करण्यापूर्वी, प्रसन्ना शंकर यांनीही त्यांच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले होते. त्यांनी काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये दावा केला होता की, दिव्या यांचे अनूप (Anoop) नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या ६ महिन्यांपासून अफेअर सुरू आहे. पुरावा म्हणून त्यांनी काही कथित व्हॉट्सॲप मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स शेअर केले होते, ज्यात दिव्या यांनी अनुपला ‘मोठ्या साईजचे कंडोम’ आणण्यास सांगितल्याचा उल्लेख होता. तसेच, दिव्या यांच्या ईमेल आयडीवरून हॉटेल रूम बुक केल्याचा दावाही त्यांनी केला होता. हे स्क्रीनशॉट्स अनुपच्या पत्नीने आपल्याला पाठवल्याचे प्रसन्ना शंकर यांचे म्हणणे होते. त्यांनी पोलीस आपल्यावर बेकायदेशीर पाळत ठेवत असल्याचा आरोपही केला होता.

या दोघांची भेट २००७ साली झाली होती. दोन वर्षे डेट केल्यानंतर त्यांच्यात काही काळ दुरावा आला, त्या काळात दिव्या यांनी केंब्रिज विद्यापीठातून (Cambridge University) शिक्षण पूर्ण केले. २०१३ साली ते पुन्हा एकत्र आले आणि दिव्या यांच्या घरातून विरोध असूनही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शंकर सिलिकॉन व्हॅलीतील (Silicon Valley) एका सोशल मीडिया कंपनीत काम करत होते. आता दोघांमधील वाद विकोपाला गेला असून, ते घटस्फोटासाठी लढत आहेत.

Title :  Prasanna Shankar Rippling Founder Divorce Allegations

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now