Prasanna Shankar | टेक कंपनी ‘रिप्लिंग’चे (Rippling) सह-संस्थापक प्रसन्ना शंकर (Prasanna Shankar) आणि त्यांची पत्नी दिव्या शशिधर (Divya Shashidhar) यांच्यातील घटस्फोटाचे प्रकरण (Divorce Case) आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचले आहे. दिव्या यांनी पती प्रसन्नावर केलेल्या अनेक आरोपांपैकी दोन आरोप विशेषत्वाने धक्कादायक आहेत – पतीने शरीरसंबंधास नकार दिल्यास बाहेर जाण्याची धमकी देणे आणि वेश्यांशी (Prostitutes) संपर्क साधणे. या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे प्रसन्ना यांनीही पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले आहेत.
‘बाहेर जाऊन करेन’ धमकी?
दिव्या शशिधर यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जात प्रसन्ना शंकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातील एका आरोपानुसार, २०१६ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांना प्रचंड वेदना होत असतानाही प्रसन्नाने शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. जेव्हा दिव्या यांनी नकार दिला, तेव्हा प्रसन्नाने कथितरित्या म्हटले की, ‘सेक्स त्याची मूलभूत गरज आहे आणि वेदनांची पर्वा नाही’. इतकेच नाही, तर “जर तु हे करू दिलं नाहीस, तर मी बाहेर जाऊन हे काम करेन,” अशी धमकीही (Threat) दिल्याचे दिव्या यांनी अर्जात म्हटले आहे.
याशिवाय, दिव्या यांनी डिसेंबर २०१९ मधील एका ईमेलचा (Email) हवाला दिला आहे. या ईमेलमध्ये प्रसन्ना शंकर यांनी कथितरित्या अनेक वेश्यांशी संपर्क साधला होता आणि त्यांच्याकडे त्यांचे फोटो व दर (Rates) मागितले होते, असा दावा दिव्या यांनी केला आहे. हे आरोप अत्यंत गंभीर असून, यातून पती-पत्नीमधील संबंध किती टोकाला गेले होते, याचा अंदाज येतो.
प्रसन्ना शंकरचे पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचे प्रत्यारोप
दिव्या शशिधर यांनी हे आरोप करण्यापूर्वी, प्रसन्ना शंकर यांनीदेखील पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचे (Extramarital Affair) आरोप केले होते. त्यांनी काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये दावा केला होता की, दिव्या यांचे अनूप (Anoop) नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या सहा महिन्यांपासून अफेअर सुरू आहे. पुरावा म्हणून त्यांनी काही कथित व्हॉट्सॲप मेसेजेसचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले होते.
या स्क्रीनशॉट्समध्ये दिव्या यांनी अनुपला ‘एक्स एल साईजचे कंडोम’ (XL Size Condom) आणायला सांगितल्याचा मेसेज होता, असे प्रसन्ना यांचे म्हणणे होते. तसेच, दोन प्रौढ व्यक्तींसाठी हॉटेल रूम बुक (Hotel Room Booking) केल्याचा आणि ते बुकिंग दिव्या यांच्या ईमेल आयडीवरून झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. हे सर्व पुरावे आपल्याला अनुपच्या पत्नीने पाठवले असल्याचे प्रसन्ना शंकर यांनी म्हटले होते. त्यांनी पोलीस आपल्यावर बेकायदेशीर पाळत ठेवत असल्याचा आरोपही त्यावेळी केला होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले जात असल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
Title : Prasanna Shankar Divya Shashidhar Divorce Allegations Threat






