माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार

On: April 19, 2024 9:13 AM
Loksabha Election 2024
---Advertisement---

Loksabha Election 2024 l राज्यभर लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी दिली असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रफुल्ल लोढा हे प्रचारासाठी मतदार संघात फिरत असताना ते निवडून येणार नसल्याची वस्तुस्थिती त्यांना दिसली. त्यामुळे प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली :

जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. स्मिता वाघ यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे करण पवार उभे आहेत. स्मिता वाघ यांच्यासाठी हे मोठे आव्हान असल्याचे दिसत आहे. मात्र अशातच जळगाव लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती.

प्रकाश आंबेडकर यांनी प्रफुल्ल लोढा यांची उमेदवारी 14 एप्रिलला जाहीर केली होती. मात्र अवघ्या पाच दिवसांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये काही नागरिकांच्या भेटी घेतल्यावर नागरिकांनी असे लक्षात आणून दिले, की माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येऊ शकत आहे, त्यामुळे तुम्ही माघार घ्यावी. परंतु मी खरोखरच निवडून येणार नाही अशी शक्यता देखील होती त्यामुळेच मी स्वतः लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली असल्याचं प्रफुल्ल लोढा यांनी सांगितलं आहे.

Loksabha Election 2024 l मी कोणत्याही दबावाला बळी न पडता माघार घेतली; प्रफुल्ल लोढा :

प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी माघे घेतल्यानंतर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क करून सांगितले, की जळगाव लोकसभेतून मी निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे. स सगळ्या घटनेवर प्रकाश आंबेडकर यांनी माझे कौतुक केले आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघार घेतलेली नाही, त्यामुळे तुम्ही मला धोका दिलेला नाही.

यासंदर्भात प्रफुल्ल लोढा यांनी सांगितले की, मी कोणत्याही दबावाला बळी न पडता माघार घेतली आहे. मी मतदार संघामध्ये फिरलो तेव्हा माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येत असेल तर मी माघार घेतलेली कधीही चांगली आहे. याविषयी मी प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण माहितीदेखील दिलेली आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

News Title : Prafulla Lodha withdrew his candidature

महत्त्वाच्या बातम्या-

आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, भाजपच्या सभेत शिवसैनिकांनी घातला राडा

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now