आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

On: April 19, 2024 8:48 AM
CSK vs LSG Squad
---Advertisement---

CSK vs LSG Squad l आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी बाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे 6 सामन्यात 8 गुण आहेत, हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सचे 6 सामन्यांत 6 गुण आहेत. केएल राहुलचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. मात्र या सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कशी असेल? हे जाणून घेऊयात…

लखनौ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

लखनौ सुपर जायंट्सचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल असू शकतात. याशिवाय आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या या फलंदाजांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी रवी बिश्नोई, मोहसीन खान, मयंक यादव, यश ठाकूर आणि शामर जोसेफ यांच्यावर असेल.

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, यश ठाकूर आणि शामर जोसेफ.

CSK vs LSG Squad l चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेवन :

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ड्वेन काऊन संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. त्यामुळे रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड हे या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे सलामीवीर म्हणून पाहिले जाऊ शकतात. याशिवाय फलंदाजीची जबाबदारी डेरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर असेल. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल?

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान आणि मथिशा पाथिराना.

News Title : CSK vs LSG Squad

महत्त्वाच्या बातम्या-

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now