सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर पोलिसांचा मोठा निर्णय!

On: February 4, 2025 9:27 AM
Saif Ali Khan Attack
---Advertisement---

Saif Ali Khan Attack l अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. या घटनेनंतर बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिक, लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि बार मालकांची बैठक घेतल्यानंतर आता पोलिसांनी गृहसंकुलांनाही नोटिसा पाठवल्या आहेत.

गृहसंकुलांना काय आहे आदेश? :

गृहसंकुलामध्ये नेमले जाणारे सुरक्षारक्षक, कामासाठी येणारे कामगार, घरकामासाठी ठेवलेले नोकर यांची नावे, मोबाईल क्रमांक आणि निवासाचा पत्ता आदी तपशील पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

कामगार, सुरक्षारक्षक, तसेच घरेलू कामगार आदींचा पूर्ण पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती, त्यांचा मोबाइल नंबर, त्यांचे मूळगाव, पोस्ट ऑफिस, पोलिस ठाण्याचे नाव, तालुका, जिल्हा, राज्य त्याचबरोबर मूळगावाकडील रक्ताच्या नात्यातील (आई, वडील, पत्नी, सख्खा भाऊ) यांचा मोबाइल नंबर अशी सविस्तर माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात द्यावी, अशी नोटीस गृहसंकुलांच्या अध्यक्षांना बजावण्यात आली आहे.

Saif Ali Khan Attack l एजंटवर कारवाई कधी? :

एखादा कामगार अथवा नोकर बांगलादेशी निघाला तर त्यास सोसायटी जबाबदार कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड मिळवून देण्यात एजंट पुढे असतात. त्यामुळे आधार कार्ड खरे की खोटे हे कसे तपासणार? त्यामुळे बोगस आधार कार्ड बनवून देणाऱ्यांविरोधात कारवाई होणार की नाही, असा सवाल केला जात आहे.

बांगलादेशात हिंसाचार झाल्यानंतर बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केल्याचा संशय आहे. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू असतानाच सैफचा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचे उघड झाले. त्यानंतर बांगलादेशींविरोधातील कारवाईला वेग आला. पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक, लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि बारमालकांची बैठक घेऊन बांगलादेशी नागरिकांची माहिती लपविल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

News Title : police-notice-to-housing-societies-after-attack-on-saif-ali-khan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now