PMEGP Loan | स्वतःचा व्यवसाय करायचाय?, मग फक्त आधार कार्डवर मिळवा तब्बल 10 लाखांचं लोन

On: January 20, 2024 3:44 PM
PMEGP Loan
---Advertisement---

PMEGP Loan | सध्याच्या घडीला तरुण-तरुणी ऑफिसमध्ये कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा काही व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिक प्रयत्नशील असतात. मात्र, व्यवसाय उभा करण्यासाठी पैसाही तेवढा मोठा लागतो. यासाठी आता केंद्रातील मोदी सरकारने एक नवीन योजना (PMEGP Loan) आणली आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजासह लोन देण्याची ही योजना आहे. या लोनद्वारे सरकारची सबसिडी देखील मिळणार आहे. या योजनेचे नाव ‘पीएम रोजगार सृजन कार्यक्रम योजना’ असे आहे. यासाठी तुम्हाला खूप कागदपत्रांची देखील गरज भासणार नाही. कारण, फक्त आधार कार्ड वर तुम्हाला 10 लाखांपर्यंत लोन मिळणार आहे.

मोदी सरकारने आणली मोठी योजना-

मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ‘पीएम रोजगार सृजन कार्यक्रम योजना’ (PMEGP Loan) अंमलात आणली आहे. या योजने अंतर्गत तुम्हाला 2 लाखपासून ते 10 लाख पर्यंत व्यवसायासाठी लोन मिळणार आहे. यावरील व्याजदर हा अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय व्यावसायिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

यावर मिळणारी सबसिडी ही शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लाभार्थीना 35% सबसिडी तर, शहरी भागातील लाभार्थी कर्जाच्या रकमेवर 20% सबसिडी घेऊ शकतात. अशा प्रकारे शासनामार्फत चालविण्यात येणारी ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पत्रतेच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.

PMEGP Loan घेण्यासाठीची पात्रता-

‘पीएम रोजगार सृजन कार्यक्रम योजना’चा (PMEGP Loan) लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे-

  1. लाभार्थीचे वय हे 18 वर्ष पूर्ण असावे.
  2. तसेच, लोन फक्त लहान आणि मध्यम श्रेणीतील व्यापऱ्यांनाच देण्यात येणार आहे.
  3. लोन घेण्यासाठी लाभार्थीकडे आपण काय व्यवसाय करणार, याचा प्लॅन असावा. प्लॅन चांगला असेल तरच बँक लोन देण्यासाठी पात्र ठरवेल.
  4. लोन घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे असायला हवीत.
  5. ज्या व्यवसायासाठी लोन घेण्यात येणार आहे, तो व्यवसाय अधिकृत असायला हवा.

PMEGP Loan घेण्यासाठीची लागणारी कागदपत्रे-

‘पीएम रोजगार सृजन कार्यक्रम योजना’ (PMEGP Loan) अंतर्गत लोन घेण्यासाठी तुम्हाला खालील सर्व कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे. आपल्याकडे ती आहे की नाही याची संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावा.

पॅन कार्ड

बँक खाते पासबुक

GST नंबर

आधार कार्ड (मोबाइल नंबर लिंक झालेले)

उद्योग रेजिस्ट्रेशन नंबर (उद्योग नोंदणी क्रमांक ज्याला कॉर्पोरेट/कंपनी ओळख क्रमांक किंवा CIN म्हणूनही ओळखले जाते)

व्यवसाय संबंधित ओरिजनल कागदपत्रे

अशाप्रकारे तुम्ही ‘पीएम रोजगार सृजन कार्यक्रम योजना’साठी पात्र ठरू शकता.

News Title: PMEGP Loan

महत्त्वाच्या बातम्या-

Shoaib Malik | घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएब मलिकनं केलं दुसरं लग्न; सर्वांनाच दिला धक्का

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे रेट

Manoj Jarange | ‘छातीवर गोळ्या लागल्या तरी…’; मनोज जरांगे रडले

Gold-Silver Price Today | सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

T20 World Cup 2024 | हार्दिक पांड्या की शिवम दुबे?, वर्ल्डकपला कुणाला संधी, मोठी माहिती समोर

Join WhatsApp Group

Join Now