Gold-Silver Price Today | सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

On: January 20, 2024 10:27 AM
Gold-Silver Price Today
---Advertisement---

Gold-Silver Price Today | मार्केटमध्ये आज (20 जानेवारी) सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली. तर, चांदीच्याही किमती वाढल्या आहेत. सोन्याच्या दरात 10 प्रति ग्रामने 300 रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदीतही 200 रुपये वाढले आहेत.

जागतिक बाजारात सोने 6.04 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस $ 2029.63 वर व्यवहार करत आहे, तर चांदी $ 0.16 च्या कमजोरीसोबत $ 22.61 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. त्यामुळे आज सोने-चांदीचे भाव वाढले आहेत.

जाणून घ्या आजचे भाव

आजच्या सोने-चांदी भाव (Gold-Silver Price Today ) वाढीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 62,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच, चांदीचा दर 75,700 रुपये प्रति किलो झाला आहे. नागपुरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नागपुरात चांदीचा दर 75,700 रुपये किलो आहे.

मुंबई, नागपूर, पुणे येथे सोने-चांदीचा भाव समान आहे.मात्र, देशातील इतर राज्यात या भावात थोडीफार तफावत दिसून येत आहे. नाशिकमध्ये चांदीचे भाव समान आहे. मात्र, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आजच्या दरानुसार नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 63,300 प्रति 10 ग्राम झाला आहे.

Gold-Silver Price Today | सर्वाधिक दर ‘या’ शहरात वाढले

सोन्याचे सर्वाधिक दर (Gold-Silver Price Today ) चेन्नईमध्ये वाढले आहेत. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 58,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 63,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 77,200 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा चेन्नईत सोन्या-चांदीच्या भावात तेजी आली आहे.

बाकी म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर, सूरत, पटणा, चंदीगड, लखनऊ, बेंगळुरू या शहरात सोन्या-चांदीचे हाव समान आहेत. यानुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा दर 77,200 रुपये प्रति किलो आहे.

News Title- Gold-Silver Price Today

महत्वाच्या बातम्या- 

Team India चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

Rashmika Mandanna | ‘मी जोरात ओरडले, रडले…’; ‘या’ अभिनेत्याचं नाव घेत रश्मिका मंदानाने केला खुलासा

Ram Mandir | पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने शेअर केले श्रीरामाचा फोटो, म्हणाला ‘माझा रामलल्ला…’

Ira Khan Wedding Teaser | आमिरच्या लेकीने शेअर केला लग्नाचा टीझर, पाहा व्हिडीओ

Ram Mandir | रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, ‘या’ ठिकाणी विराजणार भाऊ लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न

Join WhatsApp Group

Join Now