पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! रामनवमीनिमित्त वाहतुकीत केले मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

On: March 25, 2026 5:08 PM
Pimpri Chinchwad Traffic Diversion
---Advertisement---

Pimpri Chinchwad Traffic Diversion | पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची वाहतूक सूचना समोर आली आहे. राम नवमी उत्सवानिमित्त 26 मार्च 2026 रोजी शहरात विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाने शहरातील काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.

यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी विशेष अधिसूचना जारी केली आहे. 26 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत (किंवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत) काही रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा आणि मिरवणुकीतील वाहनांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.

भोसरी परिसरातील वाहतूक बदल :

भोसरी भागात हरिओम स्वीट चौक ते भोसरी ओव्हरब्रिज हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून विदर्भ मित्र मंडळ ते आळंदी रोडचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दिघी चौक ते दिघी रोड हा मार्गही बंद राहणार असून या मार्गासाठी पीएमटी चौक ते आळंदी रोड हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

Pimpri Chinchwad Traffic Diversion | चिखली, मोशी आणि चाकण परिसरातही बदल :

चिखली विभागात पुणे-नाशिक महामार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक (मोशी) येथे प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी भारतमाता चौक मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच कुदळवस्ती ते मोशी हा मार्गही बंद राहणार आहे. (Pimpri Chinchwad Traffic Diversion)

दरम्यान चाकण परिसरात चाकण चौक ते महात्मा फुले व नेहरू चौक, आंबेठाण चौक ते महात्मा फुले चौक तसेच मार्केट यार्ड ते नेहरू चौक हे मार्ग बंद राहणार आहेत. या भागासाठी माणिक चौक, मेदनकरवाडी, तळेगाव चौक आणि शिक्रापूर रोड हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सुचवलेले मार्ग वापरावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Pimpri Chinchwad Traffic Diversion on Ram Navami 2026: Check Closed Roads and Alternate Routes

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now