गुड न्यूज! पेट्रोल-डिझेलचे दर उतरणार! 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण होणार

On: April 15, 2025 3:54 PM
Today Petrol Diesel Price
---Advertisement---

Petrol Diesel Price l महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतात कच्च्या तेलाच्या आयात दरात गेल्या ५ वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. परिणामी, लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Cut) किमतीत कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रति बॅरल दर 70 डॉलरच्या खाली :

सध्या भारतात कच्च्या तेलाची सरासरी आयात किंमत प्रति बॅरल 69.39 डॉलर इतकी आहे, जी 2021 नंतरची सर्वात कमी किंमत मानली जात आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये हीच किंमत 89.44 डॉलर होती, म्हणजेच एका वर्षात तब्बल 22% घट नोंदवण्यात आली आहे.(Petrol Diesel Price Cut)

जागतिक मंदी, ट्रेड वॉरचे तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या जागतिक मागणीत घट झाली आहे. त्यामुळे पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता एचटी आणि रॉयटर्सच्या अहवालांमध्ये वर्तवण्यात आली आहे.

भारतातील स्थिती आणि संभाव्य परिणाम :

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 87% तेल आयात करतो. शुद्धीकरण उद्योगात याच कच्च्या तेलाचा 90% खर्चाचा वाटा असतो. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरल्यास, याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर होऊ शकतो.

Goldman Sachs ने 2025 मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत 63 डॉलर प्रति बॅरल राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर तेल उत्पादक देशांची संघटना OPEC ने सुद्धा मागणी घटण्याचा इशारा दिला आहे.

News Title : Petrol-Diesel Prices May Drop Soon as India’s Crude Import Cost Hits 5-Year Low

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now