अरविंद केजरीवालांना हरवणारे प्रवेश वर्मा आहेत तरी कोण?, जाणून घ्या संपूर्ण कारकिर्द

On: February 8, 2025 2:30 PM
Parvesh Verma
---Advertisement---

Parvesh Verma l दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election 2025) आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे, नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांना भाजप नेते प्रवेश वर्मा (Parvesh Verma) यांनी 3182 मतांनी पराभूत केले आहे. त्यामुळे ‘आप’च्या पराभवाबरोबरच प्रवेश वर्मा यांचे नाव राजकीय चर्चेत आले आहे. चला, जाणून घेऊया प्रवेश वर्मा यांची संपूर्ण कारकीर्द.

प्रवेश वर्मा कोण आहेत? :

प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते साहिब सिंग वर्मा (Sahib Singh Verma) यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1977 रोजी दिल्ली येथे झाला. वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमधून घेतली आणि त्यानंतर फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए (MBA) पूर्ण केले.

Parvesh Verma l केजरीवाल यांचा पराभव – काँग्रेस तिसऱ्या स्थानावर :

2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना 3182 मतांनी पराभूत केले. काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित (Sandeep Dikshit) तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना केवळ 3873 मते मिळाली. या पराभवामुळे केजरीवाल यांचा गड कोसळला असून, या मतदारसंघातील इतर 20 उमेदवारांचे अनामत रक्कमही जप्त झाली आहे.

प्रवेश वर्मा यांचा राजकीय प्रवास :

2013: पहिली विधानसभा निवडणूक आणि काँग्रेसचा पराभव :

प्रवेश वर्मा यांनी 2013 मध्ये मेहरौली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेस नेते योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) यांचा पराभव केला.

2014 आणि 2019: लोकसभा निवडणुकांतील विजय :

2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजयी होत संसदेवर पहिले पाऊल ठेवले. 2019 मध्येही त्यांनी काँग्रेसचे महाबल मिश्रा (Mahabal Mishra) यांचा 5.78 लाख मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला.

90 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक :

प्रवेश वर्मा यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता 90 कोटी रुपये आहे.

जंगम मालमत्ता: 77 कोटी 89 लाख 34 हजार रुपये
स्थावर मालमत्ता: 12 कोटी 19 लाख रुपये
वाहने: टोयोटा इनोव्हा, टोयोटा फॉर्च्युनर आणि महिंद्रा एक्सयूव्ही
रोख रक्कम: 2 लाख 20 हजार रुपये

Parvesh Verma l राजकीय ताकद आणि दिल्लीतील वर्चस्व :

प्रवेश वर्मा हे केवळ दिल्लीतील राजकारणात नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही भाजपचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विजयामुळे दिल्लीतील भाजपच्या यशात मोठे योगदान मानले जात आहे. त्यांनी केजरीवाल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून भाजपला नवी दिल्लीतील सत्ता मिळवून दिली आहे.

प्रवेश वर्मा यांचा उदय आणि भाजपसाठी महत्त्व :

प्रवेश वर्मा यांचा पराभव हा केवळ राजकीय विजय नसून, भाजपसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. दिल्लीतील परंपरागत भाजप समर्थक आणि मध्यवर्गीय मतदारांवर असलेल्या प्रभावामुळे त्यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले आहे.

News title : Parvesh Verma: The BJP Leader Who Defeated Arvind Kejriwal

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now