भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याने केले 4 मोठे दावे!

On: May 7, 2025 4:19 PM
Pakistan
---Advertisement---

Operation Sindoor l पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारताने (India) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) द्वारे दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानकडून (Pakistan) विविध दावे केले जात आहेत. भारताने (India) नऊ ठिकाणी हल्ले केल्याचे सांगितले असताना, पाकिस्तानने केवळ सहा ठिकाणी हल्ले झाल्याचा दावा केला आहे, तसेच भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचाही दावा केला आहे.

पाकिस्तानचे हल्ल्यावरील दावे

भारताने (India) पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर (Air Strike) पाकिस्तानच्या (Pakistan) लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारताने (India) केवळ सहा ठिकाणी हल्ले केले, नऊ ठिकाणी नाही. भारताच्या (India) मते, या कारवाईत फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झालेला नाही.

मात्र, याच्या अगदी उलट, पाकिस्तानने दावा केला आहे की भारताच्या (India) या हल्ल्यात त्यांचे २६ नागरिक मारले गेले असून ४६ जण जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, भारताची (India) पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावाही पाकिस्तानकडून (Pakistan) करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी भारताने (India) एअर स्ट्राईक (Air Strike) केला, तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच, अशा उलट्या बोंबा मारायलाही पाकिस्तानने (Pakistan) सुरुवात केली आहे.

भारताची कारवाई आणि पार्श्वभूमी

भारताने (India) या मिशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव दिले होते. मध्यरात्री भारताने (India) पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानवर (Pakistan) केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये (Air Strike) पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) ५ आणि पाकिस्तानमधील (Pakistan) ४ असे एकूण ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या धडक कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये (Pakistan) पंजाबमधील (Punjab) लाहोरपासून (Lahore) पाकव्याप्त काश्मीरपर्यंत (PoK) मोठा हाहाकार माजला.

पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने (India) ही कारवाई केली.

News title : Pakistan’s Claims After India’s Air Strike

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now