Pahalgam Terror Attack | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (Pakistan) दबाव वाढवला असताना, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य केले आहे. गेल्या ३ दशकांपासून आम्ही अमेरिकेसाठी ‘घाणेरडे काम’ करत होतो, अशी अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे मात्र नाकारले.
आसिफ यांचं वक्तव्य
भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे, व्हिसा रद्द करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यासारखे कठोर निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तान १९७२ चा शिमला करार रद्द करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याच्या इतिहासावर प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) म्हणाले, “आम्ही गेल्या ३ दशकांपासून अमेरिकेसाठी (America) हे घाणेरडे काम करत आहोत.” त्यांच्या या विधानामुळे, दहशतवाद्यांना कोणाच्या सांगण्यावरून मदत मिळत होती, याबद्दल पाकिस्तानच्या (Pakistan) भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दहशतवाद्यांना उखडून टाकण्याचा इशारा दिला आहे.
पहलगाम हल्ला ‘स्वदेशी प्रतिकार’
अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या दुसऱ्या मुलाखतीत मात्र आसिफ यांनी भारताचे आरोप फेटाळले. पहलगाम (Pahalgam) हल्ल्याशी पाकिस्तानचा (Pakistan) संबंध नसून, ही भारतातील कथित ताब्यातील प्रदेशातील “स्वदेशी प्रतिकार” असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या काश्मीरवरील ठरावांचा उल्लेख करत, मानवाधिकार उल्लंघनांवरून लक्ष हटवण्यासाठी भारत हे आरोप करत असल्याचे म्हटले.
भारताकडून सीमापार कारवाईची शक्यता त्यांनी वर्तवली, पण २०१९ मध्ये भारतीय विमान पाडल्याचा संदर्भ देत पाकिस्तान (Pakistan) प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचेही सांगितले. लष्करप्रमुखांचा हल्ल्याशी संबंध असल्याचे दावे त्यांनी फेटाळले आणि काश्मीर (Kashmir) ही पाकिस्तानची “गळाभिन्न नस” असल्याचा पुनरुच्चार केला. काश्मीर (Kashmir) वाद पाकिस्तानसाठी अस्तित्वात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Title : Pak Minister Admits ‘Dirty Work’ for US






