Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या अहमदाबादच्या (Ahmedabad) एका पर्यटकाने आपला थरारक अनुभव कथन केला आहे. ऋषी भट (Rishi Bhatt) हे झिपलाईन करत असतानाच खाली गोळीबार सुरू झाला आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने त्यांचा जीव वाचला. त्यांनी एका स्थानिक व्यक्तीवर संशयही व्यक्त केला आहे.
झिपलाईन दरम्यान गोळीबाराचा थरार
अहमदाबादचे (Ahmedabad) रहिवासी ऋषी भट (Rishi Bhatt) आपल्या कुटुंबीयांसोबत पहलगाममध्ये पर्यटनाचा आनंद घेत होते. २२ एप्रिल रोजी, ज्या दिवशी हल्ला झाला, त्या दिवशी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बैसरन व्हॅलीमध्ये झिपलाईन करण्याचा निर्णय घेतला. तिथे मोठी रांग होती आणि त्यांच्यापुढे तीन कुटुंबे होती. एकामागून एक कुटुंबे झिपलाईनसाठी गेली.
ऋषी भट (Rishi Bhatt) यांच्या कुटुंबीयांची वेळ आली तेव्हा प्रथम त्यांचा मुलगा, नंतर पत्नी आणि शेवटी ते स्वतः झिपलाईनसाठी गेले. ऋषी भट (Rishi Bhatt) झिपलाईनच्या मध्यभागी असतानाच खाली गोळीबार सुरू झाला. त्यांनी खाली पाहिले असता, चार-पाच जण गोळ्या लागून पडलेले दिसले. अवघ्या ७ मिनिटांच्या अंतराने ते बचावले होते. खाली उतरताच त्यांनी झिपलाईनच्या दोऱ्या काढल्या आणि पत्नी व मुलांना घेऊन तेथून पळ काढला.
Pahalgam Attack | ‘अल्लाहू अकबर’ चा नारा आणि संशय
पळत मुख्य गेटपर्यंत पोहोचल्यावर नेटवर्क मिळताच त्यांनी अहमदाबादमधील (Ahmedabad) भावाला फोन करून हल्ल्याची आणि आपण अडकल्याची माहिती दिली. साधारण १८ ते २२ मिनिटांत लष्कर (Army) तेथे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले, कारण दुसऱ्या कॉलमध्ये त्यांनी भावाला लष्कर आल्याचे कळवले होते.
ऋषी भट (Rishi Bhatt) यांनी एक धक्कादायक बाब सांगितली. झिपलाईनसाठी मदत करणारा एक स्थानिक व्यक्ती, जो इतरांना बेल्ट लावत होता, तो त्यांच्या आधी गेलेल्या कुटुंबांच्या वेळी शांत होता. मात्र, दुपारी १:२८ वाजता, जेव्हा ऋषी भट (Rishi Bhatt) यांची पाळी आली, तेव्हा त्याच व्यक्तीने तीन वेळा ‘अल्लाहू अकबर’ (Allahu Akbar) असा नारा दिला आणि त्याच क्षणी गोळीबार सुरू झाला. त्यामुळे, ती व्यक्ती या कटात सामील असावी, असा संशय ऋषी भट (Rishi Bhatt) यांनी व्यक्त केला. आई-वडिलांच्या आणि देवाच्या आशीर्वादामुळेच वाचलो, असे ते म्हणाले.
Deadly shooting caught on camera ????
Last week in Pahalgam, India, a deadly terror attack claimed 26 lives and injured 20 others, with horrific scenes inadvertently captured on camera by Rishi Bhatt, a resident of Paldi, Ahmedabad. Unknowingly, Bhatt filmed himself riding a… pic.twitter.com/XSM6d0jNgi
— J Stewart (@triffic_stuff_) April 28, 2025






