पहलगाम हल्ल्याबाबत तपासातून सर्वात मोठा खुलासा समोर!

On: April 30, 2025 4:20 PM
Pahalgam Attack
---Advertisement---

Pahalgam Terror Attack l जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) तपासात एक मोठा खुलासा झाला आहे. लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) टॉप कमांडर फारुख अहमद (Farooq Ahmed) याचे नाव या हल्ल्याशी जोडले जात आहे. त्याने तयार केलेल्या ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या (OGW – Over Ground Workers) नेटवर्कने हल्ल्यासाठी मदत केल्याचे तपास यंत्रणांच्या सूत्रांनी म्हटले आहे.

फारुखचे नेटवर्क आणि मागील हल्ले

तपास यंत्रणेतील सूत्रांनुसार, पहलगाम (Pahalgam) हल्ल्यामागे फारुख अहमद (Farooq Ahmed) याच्या ओव्हरग्राउंड कामगारांच्या नेटवर्कचा मोठा हात होता. या नेटवर्कने हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी (Pakistani) दहशतवाद्यांना (FT – Foreign Terrorists) सर्वतोपरी मदत पुरवली. फारुख अहमद (Farooq Ahmed) हा लष्कर-ए-तैयबाचा (LeT) एक प्रमुख कमांडर असून, तो सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK – Pakistan Occupied Kashmir) लपून बसल्याची माहिती आहे.

गेल्या दोन वर्षांत फारुखच्या (Farooq Ahmed) याच ओजीडब्ल्यू (OGW) नेटवर्कने काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. पहलगाम (Pahalgam) येथील हल्ला हा त्यापैकीच एक प्रमुख आणि भीषण हल्ला असल्याचे मानले जात आहे. या नेटवर्कमुळे खोऱ्यातील शांतता भंग करण्याचे मोठे प्रयत्न झाले आहेत.

Pahalgam Terror Attack l फारुखची घुसखोरी आणि पाकिस्तानची भीती

फारुख अहमद (Farooq Ahmed) हा १९९० ते २०१६ या काळात पाकिस्तान (Pakistan) आणि भारतात (India) सतत ये-जा करत होता. त्याला खोऱ्यातील डोंगराळ आणि घुसखोरीच्या मार्गांची खडान् खडा माहिती आहे. तो पाकिस्तानच्या (Pakistan) तीन वेगवेगळ्या सेक्टरमधून काश्मीरमध्ये (Kashmir) घुसखोरी करत असे. काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी कुपवाडा (Kupwara) येथील त्याचे घर जमीनदोस्त केले होते.

पहलगाम (Pahalgam) हल्ल्यानंतर त्याच्या अनेक साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून एका सुरक्षित ॲपद्वारे (Secure App) पाकिस्तानातील (Pakistan) आपल्या नेटवर्कच्या सदस्यांच्या संपर्कात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. दुसरीकडे, भारताने (India) तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्याने पाकिस्तानची (Pakistan) झोप उडाली आहे. पाकिस्तानी (Pakistani) माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार (Attaullah Tarar) यांनी मध्यरात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन, भारत (India) पुढील २४-३६ तासांत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त केली.

News title : Pahalgam Attack: Top Commander Farooq Ahmed Linked

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now