Recharge Plan | जर तुम्हाला ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शो पाहण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका खास प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 9 ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर कंटेंट पाहता येईल आणि तेही कोणत्याही वेगळ्या सबस्क्रिप्शनशिवाय! (Recharge Plan)
जिओचा (Jio) 445 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस मिळत नाही, तर हाय-स्पीड डेटाही मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो, म्हणजेच एकूण 56GB डेटा वापरता येतो. यासोबतच, अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात.
एकाच प्लॅनमध्ये 9 ओटीटी (OTT)
या प्लॅनमध्ये तुम्हाला Sony Liv, Zee5, Lionsgate Play, Discovery Plus, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, FanCode आणि Hoichoi अशा 9 ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सिरीज पाहता येतील. हे सर्व प्लॅटफॉर्म Jio TV ॲपद्वारे वापरता येतात. याशिवाय, Jio Cloud चा फ्री ॲक्सेस देखील मिळतो. (Recharge Plan)
एअरटेलचा (Airtel) 429 रुपयांचा प्लॅन
एअरटेल (Airtel) देखील याच किंमतीत एक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. एअरटेलच्या (Airtel) 429 रुपयांच्या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 2.5GB डेटा, 100 SMS, अमर्यादित फ्री कॉलिंग आणि 5 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तसेच, अमर्यादित 5G डेटा, स्पॅम अलर्ट आणि फ्री हॅलोट्यून्ससारखे फायदेही मिळतात. (Recharge Plan)
Title : One Recharge Plan 9 OTT Platforms Great News for Entertainment Lovers






