डिसेंबरमध्ये पुन्हा महामारी येणार? संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं

On: November 22, 2025 2:01 PM
Nostradamus Predictions 2025
---Advertisement---

Nostradamus Predictions 2025 | वर्ष 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे आणि वर्षाच्या अखेरच्या महिन्याबद्दल केलेल्या काही भविष्यवाण्यांनी संपूर्ण जगाला विचारात टाकलं आहे. जगभरात पुन्हा एकदा महामारी येऊ शकते, अशी नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाणीवर आधारित बातमी बाहेर आल्यानंतर सोशल मीडिया, संशोधक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिसेंबर महिना कसा जाणार? आणि या काळात जगावर काही मोठा धोका येणार का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ नॉस्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांचे विश्लेषण करत आहेत. त्यांच्या भविष्यसूचक लेखनात 2025 च्या अखेरीस पुन्हा एक महामारी सुरू होण्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात येतो आहे.

युद्ध, उल्कापात आणि राजकीय उलथापालथ? :

नॉस्त्रेदमस यांच्या भविष्यात लिहिलेल्या संकेतांमध्ये इंग्लंडमध्ये मोठं युद्ध, पृथ्वीवर उल्का कोसळणे आणि नव्या महामारीची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मानवजातीसमोर एक गंभीर संकट उभं राहू शकतं, अशी व्याख्या अनेक भविष्यवाणी विश्लेषक करत आहेत.

ब्रिटानिकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, नॉस्त्रेदमस यांनी एका जलनेत्याच्या उदयानंतर जागतिक राजकीय बदल, सत्ता बदल आणि संघर्षांची भविष्यवाणी केली होती. काही तज्ज्ञांच्या मते ही भविष्यवाणी सध्याच्या जागतिक राजकीय परिस्थितीशी जुळत असल्याचं दिसतंय.

Nostradamus Predictions 2025 | महामारीचं पुनरागमन? :

नॉस्त्रेदमसच्या काही भविष्यवाण्यांनुसार, जुन्या काळातील एक महामारी पुन्हा परत येईल आणि ती पूर्वीपेक्षा अधिक घातक असेल. त्यात लिहिलं आहे की, “जुन्या रोगाने पुन्हा एकदा जगाला जखडून टाकेल.”

तज्ज्ञांच्या मते ही भविष्यवाणी कोविड-19 नंतर पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संकट निर्माण होण्याविषयी सूचित करते. लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. (Nostradamus Predictions 2025)

नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाण्यात जागतिक राजकारणात मोठे बदल होण्याचा उल्लेख आहे. महासत्ता एकमेकींशी भिडतील आणि पाश्चिमात्य देशांचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. अशा स्थितीत नव्या जागतिक सत्ताकेंद्राचा उदय होऊ शकतो, अशीही त्यांची कल्पना आहे.

युद्ध आणि संघर्षाचा परिणाम म्हणून आर्थिक बाजार कोलमडण्याची, चलनव्यवस्थेत बदल होण्याची आणि लोकांच्या जीवनात अस्थिरता निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जग पुढच्या संकटासाठी तयार आहे का? :

जग 2020 मधील महामारीनंतर अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही. त्यामुळे नॉस्त्रेदमसच्या या शक्यतेमुळे अनेक लोकांमध्ये भीती आहे. तथापि, इतिहास सांगतो की नॉस्त्रेदमसची सर्व भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरलेली नाही. त्यामुळे ही भविष्यवाणी कितपत खरी ठरेल, हे वेळच सांगेल.

News Title: Nostradamus Predictions 2025: New Pandemic, War, and Asteroid Warning – World in Panic

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now