Siddhivinayak Temple l मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी (Devotees) एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने (Trust) भाविकांना तोकडे कपडे (Short Clothes), फाटकी जीन्स (Torn Jeans) घालून मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महिला भाविकांकडून स्वागत होत असले, तरी काही संमिश्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.
मंदिरात पावित्र्य राखण्यासाठी निर्णय :
सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने माघी गणेशोत्सवाची (Maghi Ganeshotsav) माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) मंदिर प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या काही महिला भाविक तोकडे कपडे परिधान करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मंदिराकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आता प्रसादासाठी प्लास्टिक पाऊचऐवजी (Plastic Pouch) कागदी पाऊचचा (Paper Pouch) वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.
सिद्धिविनायक मंदिराने घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींना हा निर्णय पटलेला नाही. मात्र, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






