उज्वल निकम यांच्या ‘त्या’ मागणीने वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात!

On: April 11, 2025 7:17 PM
Valmik Karad, Ujjwal Nikam (1)
---Advertisement---

Valmik Karad | बीड (Beed) जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड (Valmik Karad) याच्यावर आता कायद्याचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी कराडची सर्व स्थावर आणि चल संपत्ती जप्त करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. याबाबत करण्यात आलेल्या अर्जावर कराडकडून कोणताही खुलासा सादर करण्यात आलेला नाही, त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीत वाल्मिक कराड याने आपला कोणताही सहभाग नसल्याचे सांगत सुटकेसाठी अर्ज केला आहे. त्याने स्पष्ट केलं की, देशमुख हत्या किंवा खंडणी प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही आणि कोणताही पुरावा देखील सापडलेला नाही. मात्र, पोलीस आणि सरकारी वकिलांनी सादर केलेल्या माहितीनुसार, कराडकडे प्रचंड प्रमाणावर संपत्ती आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहे .

पुण्याच्या वाकडमधील 3.15 कोटींचा फ्लॅट, एफसी रोडवर 7 दुकाने, केज, लातूर, परळी व बीडमध्ये रो हाऊस, प्लॉट्स, बंगल्यांची मालकी, तसेच शेती आणि स्टोन क्रेशर युनिटदेखील त्याच्या नावावर आहेत.

धनंजय देशमुख यांचा आरोप – ‘जेलमध्ये मिळतेय VIP वागणूक’

या खटल्याच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, आरोपींना जेलमध्ये कोणत्याही प्रकारची भीती वाटत नसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते. त्यांनी विष्णू चाटे याला लातूर येथून बीड जेलमध्ये हलवण्याच्या मागणीवरही शंका व्यक्त करत सांगितले की, हे आरोपी पुन्हा एकत्र येऊन दुसरा कट रचण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचबरोबर त्यांनी न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान असेही सांगितले की, जेलमधील VIP वागणुकीमुळेच आरोपी बेधडकपणे वागत आहेत. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने खळबळ उडवली होती. त्यामुळे राज्यभरात या खटल्याकडे मोठे लक्ष आहे. उज्ज्वल निकम यांच्या मागणीनंतर कराडची संपत्ती जप्तीबाबत कोर्ट काय निर्णय देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Title: Nikam Demands Seizure of Valmik Karad Assets

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now