दिल्ली स्फोट प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; खरा सूत्रधार सापडला?

On: November 17, 2025 12:07 PM
Delhi Blast
---Advertisement---

Delhi Blast | 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या प्रचंड स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. सुरुवातीला हा साधा स्फोट वाटत असला तरी तपासात तो बॉम्बस्फोट असल्याचे स्पष्ट झाले. लाल किल्ल्यासारख्या अतिसंवेदनशील परिसरात झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या. या हल्ल्याचा डाव मागील काही दिवसांपासून रचला जात होता, असा धक्कादायक खुलासा तात्काळ समोर आला. (Delhi Blast News)

या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतशी अधिक गंभीर माहिती बाहेर येऊ लागली. या बॉम्बस्फोटातील धागेदोरे जम्मू-काश्मीरच्या पुलवामापर्यंत पोहोचले असून थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून या हल्ल्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 20 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या कटामध्ये काही डॉक्टरांचादेखील सहभाग होता.

एनआयएच्या तपासात सूत्रधाराचा पर्दाफाश :

या स्फोटात वापरण्यात आलेली i-20 कार जम्मू-काश्मीरमधील डॉ. उमर नबी याच्या नावावर असल्याचे तपासात समोर आले आहे. पंपोर तालुक्यातील संबूरा गावचा रहिवासी असलेला उमर नबी हा व्यावसायिक डॉक्टर असून, त्याचा या संपूर्ण कटात थेट सहभाग असल्याची NIAला खात्री पटली आहे. नबी काही दिवसांपूर्वीच कारच्या व्यवहारासाठी दिल्लीत आला होता, मात्र प्रत्यक्षात तो स्फोटाच्या नियोजनासाठीच शहरात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले.

हल्ल्यात वापरलेली कार अनेक वेळा विकली आणि खरेदीही करण्यात आली होती. शेवटी खोट्या कागदपत्रांच्या आधारे तिचा व्यवहार करण्यात आला. एनआयएने या गुंतागुंतीच्या व्यवहाराचा माग काढत कारच्या मुळ मालकाला अटक केली आणि चौकशीतून या हल्ल्याचा खरा सूत्रधार उघड झाला. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात उच्च क्षमतेची स्फोटके भरण्यात आली होती. (Delhi Blast News)

Delhi Blast | टार्गेट अयोध्या-वाराणसी, पण स्फोट दिल्लीमध्येच :

एनआयएच्या तपासानुसार, स्फोट घडवून आणणारा दहशतवादी उमर हा स्वतः कार चालवत होता. त्यांचे खरे टार्गेट दिल्ली नसून अयोध्या आणि वाराणसी असल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी आणि गोंधळामुळे कारमध्येच आधीच स्फोट झाला आणि संपूर्ण योजना विस्कटली. स्फोटाच्या वेळी उमर स्वतःही कारमध्ये उपस्थित होता.

स्फोट होण्याआधी i-20 कार दिल्लीमध्ये तब्बल 11 तास फिरत असल्याचे CCTV फुटेजद्वारे समोर आले आहे. या वेळेत कारचा माग काढणे अवघड जावे म्हणून अनेक ठिकाणी ती जाणूनबुजून पार्क करण्यात आली होती. मात्र अखेर लाल किल्ला परिसरात कारमध्ये असलेली स्फोटके उडाली आणि मोठी दुर्घटना घडली.

News Title: NIA Cracks Delhi Red Fort Blast Case: Doctor Umar Nabi Identified as Mastermind Behind Car Bomb Plot

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now